मी दुसऱ्या खेळाडूंवर नजर ठेऊन नाही- बार्सेलोना प्रशिक्षक एर्नस्टो वेल्वर्द

21:48:51


आजघडीला फुटबॉल जगतात उद्याचे सुपरस्टार म्हणून काही तरुण खेळाडूंकडे पहिले जाते त्यात मबाप्पे याचा सर्वात वरचा क्रमांक लागतो. अवघ्या १८ वर्षाचा असणारा हा खेळाडू त्याच्या गती आणि फुटबॉल कौशल्याने जगभरात ओळखला जाऊ लागला आहे. सध्या नेमार जुनियर सोबत त्याची चांगली जोडी जमली आहे आणि तो पॅरिस सेंट जर्मेन संघाचा महत्वाचा खेळाडू देखील बनला आहे.

काही दिवसांपूर्वी मबाप्पे याच्या एजन्टने खुलासा केला की, “नेमारने बार्सेलोना संघ सोडल्यावर मबाप्पेला फक्त बार्सेलोना संघासोबत करारबद्ध ह्यायचे होते. त्याला लियोनेल मेस्सी सोबत खेळायचे होते.” त्यानंतर फुटबॉल जगतात अनेक चर्चांना पेव फुटले. या चर्चेतून बार्सेलोना संघाचे प्रशिक्षक एर्नस्टो वेल्वर्द देखील वाचू शकले नाहीत.

२१ तारखेला मध्यरात्री होणाऱ्या बार्सेलोना विरुद्ध मालागा या सामन्यासाठीच्या पत्रकार परिषदेला उपस्थित राहिल्यानंतर त्यांना मबाप्पे आणि त्याच्या ट्रान्फर विषयी अनेक प्रश्न विचारण्यात आले. त्यावर बार्सेलोना संघाच्या प्रशिक्षकांनी कामचलाऊ उत्तरे दिली. ते म्हणाले,” तुम्हला काय बोलावे, मला काही समजत नाही. ट्रान्सफर साठी अनेक खेळाडूंशी संपर्क साधला जातो.”

नेमारच्या विदाईनंतर बार्सेलोना संघ अनेक खेळाडूंच्या संपर्कात होता परंतु या संघाने ओस्माने डेमब्ले या ब्रूसिया डॉर्टमंडच्या खेळाडूंशी करार करून त्याला विकत घेतले. मबाप्पे आणि डेम्बले हे दोन्ही फ्रान्स संघातील खेळाडू आहेत आणि खूप वर्षांपासून चांगले मित्रही आहेत.

वेल्वर्द यांना ट्रान्सफर मार्केटबद्दल जास्त कुतूहल नाही, संघात जे साध्या खेळाडू आहेत त्यांच्यावर लक्ष देणे ते पसंद करतात.वेल्वर्द पुढे म्हणाले, “संघाचा प्रशिक्षक या नात्याने मी या क्लब सोबत जोडलो गेलो आहे. संघात असणाऱ्या खेळाडूंकडून काहीतरी नवीन आणि चांगले करून घेण्याच्या त्यामागचा मुख्य हेतू आहे. त्यामुळे मी दुसऱ्या खेळाडूंवर नजर ठेऊन नाही आहे.”

“तुम्हाला ट्रान्सफर मार्केटमध्ये काय चालू आहे हे नक्कीच माहिती पहिजे, पण माझा विचार हा सध्या संघासोबत जोडलेल्या खेळाडूंसोबत काम करणे आहे, कारण तेच खेळाडू बार्सेलोना संघाला पुढे घेऊन जाणार आहेत.”

“जसे तुम्ही म्हणालात तसे आपण पुढे बघू, कारण सध्या जानेवारी साठी दोन महिने बाकी आहेत, त्यामुळे खूप वेळ आहे.” समर ट्रॅन्सफर विंडो १ जुलै रोजी बंद झाली होती आता पुढची ट्रांसफर विंडो जानेवारीमध्ये चालू होणार आहे. या ट्रान्सफर विंडोमध्ये या वर्षातील सर्वात जास्त ट्रान्सफर होण्याची शक्यता आहे.