१० खेळाडूंसह खेळणाऱ्या बार्सिलोनाचा अपराजित राहण्याचा सिलसिला कायम

सर्व फुटबॉल प्रेमीचे लक्ष लागलेल्या एल क्लासिकोची लढत आज मध्यरात्री झाली. या मोसमातील पहिल्या क्लासिकोमधील पराभवाचा वचपा काढण्याच्या हेतूने आणि बार्सिलोनाचा ४१ सामन्यांपासून चालत आलेला अपराजित रथ रोखण्याचे आव्हान घेऊन रियल मॅद्रिदने आपला संघ उतरवला तर कॅम्प नाऊवरील क्लासिकोच्या विजयाचा दुष्काळ संपवायच्या उद्देषाने बार्सिलोना मैदानात उतरले.

मागील सामन्यातच लीगचे विजेतेपद जिंकल्याने खूप जाणकारांचे असे मत होते की क्लासिकोमध्ये ती उत्कंठा किंवा आधीसारखी स्पर्धा पहायला मिळणार नाही. इस्कोच्या दुखापतीमुळे आज झिदानेने बेल बेन्झेमा आणि रोनाल्डोला या बीबीसी नावाने ओळखल्या जाणार्या त्रिकुटाला मैदानात उतरवले तर बार्सिलोनाने काॅटिन्होला पहिल्या ११ मध्ये स्थान दिले.

सामन्याच्या सुरुवातीपासून दोन्ही संघांनी आक्रमक पवित्रा घेतला. १० व्या मिनिटला मॅद्रिदवर प्रतिहल्ला करत रोबर्टोने उजव्या बाजूने बॉल मॅद्रिदच्या हाफमध्ये घेऊन जात सुवारेझला क्रॉस दिला ज्याचे त्याने गोलमध्ये रुपांतर करत सामन्यात १-० ची आघाडी मिळवून दिली.

परंतु यजमान संघाला ही आघाडी टिकवण्यात फार काळ यश आले नाही. अवघ्या ४ मिनिट नंतर क्रुसने दिलेला क्रॉस बेन्झेमाने घेतला आणि रोनाल्डोकडे पास दिला ज्याचा त्याने गोल करत पाहूण्या संघाला बरोबरी साधून दिली.

नंतर पुर्वार्धाच्या अखेर पर्यंत मॅद्रिदने अनेक संधी निर्माण केल्या पण त्याचा गोल करण्यात त्यांना अपयश आले. पुर्वार्धाच्या शेवटच्या २ मिनिटात सुवारेझ, मेस्सी आणि रामोसला येल्लो कार्ड दाखवत चेतावनी दिली पण शेवटच्या काही सेकंदात रोबर्टोने मार्सेलोला फटका मारला आणि त्याची शिक्षा म्हणून त्याला रेड कार्ड दाखवण्यात आले आणि बार्सिलोना केवळ १० खेळाडूंसह मैदानात राहिली.

उत्तरार्धात बार्सिलोना १ खेळाडू कमी असताना खेळत होती तर मॅद्रिदने रोनाल्डोला विश्रांती दिली. ५२ व्या मिनिटला सुवारेझने मॅद्रिदच्या पेनल्टीबॉक्स मध्ये डाव्या बाजूने येत मेस्सीला बॉल दिला जो त्याने डाव्या कोपर्यात मारत गोल केला आणि २-१ ची बढत मिळवून दिली. त्याचे प्रच्युतर म्हणून बेलेने तसाच डाव्या कोपर्यात ७२ व्या मिनिटला गोल करत सामना २-२ ने बरोबरीत सोडवला.

सामना बरोबरीत सुटला तरी हे बार्सिलोनाच्या फायद्याचे ठरले त्यांचा सा लीगमधला अपराजितचा विक्रम कायम राहिला. ४२ सामने बार्सिलोना अपराजित आहेत.

मेस्सी आणि रोनाल्डो दोघांनी काल गोल केले. दोघांची गोलची संख्या तब्बल १००० वर गेली. मेस्सीने बार्सिलोना तर्फे ५५१ तर रोनाल्डोने मॅद्रिदतर्फे ४४९ गोल्स केले आहेत.