बार्सेलोनाला पराभवाचा धक्का, रोमाचा पुढील फेरीत प्रवेश

युरोपच्या सर्वोत्तम समजल्या जाणाऱ्या  दोन लीग्स प्रिमियर लीग आणि ला लीगाच्या या मौसमातील सर्वोत्तम संघ कोणते असा प्रश्न विचारल्यावर सहज उत्तर ऐकायला मिळते ते म्हणजे मॅन्चेस्टर सिटी आणि बार्सेलोना.
दोन्ही संघ आपआपल्या लीग मध्ये अपराजित असल्याचे विक्रम आपल्या नावे करत युसीएलच्या अंतिम ८ मध्ये सुद्धा आपले स्थान निश्चित केले. सिटी समोर लीवरपुलचे तगडे आव्हान होते तर बार्सेलोना समोर तसा दुबळा समजला जाणारा रोमाचा संघ होता. परंतु दोन्ही रोमा आणि लीवरपुलने काल बार्सेलोना आणि सिटीवर विजय मिळवत त्यांना घरचा रस्ता दाखवला.
दोन लेग मध्ये खेळवल्या जाणार्या युसीएलच्या सामन्यांचा आज दूसरा लेग होता. पहिल्या लेग मध्ये सिटीला लीवरपुलने ३-० ने हरवत पुनरागमनाची खुप कमी संधी ठेवली होती. आज सामन्याच्या दोन मिनिटात गोल करत सिटीने लीवरपुलला धोक्याची सुचना दिली. लीवरपुलने नंतर सामन्यावर पकड मिळवायचे प्रयत्न चालु केले त्यात त्यांना यश आले नसले तरी त्यांनी पहिल्या हाफ मध्ये सिटीला १-० वरच रोखण्यात यश मिळवले.
दूसरा हाफ सिटीसाठी पुनरागमन घेऊन येणार असे वाटत असतानाच ५६ मिनिटला मोहम्मद सलाहने गोल करत लीवरपुलला सामन्यात १-१ ने बरोबरीत आणले आणि सिटीच्या उपांत्य फेरीच्या आशा जवळजवळ संपुष्टात आल्या.
७७ व्या मिनिटला ओटामेंडीची चुक सिटीसाठी सामन्याचा निकाल सांगुन गेली. त्याच्या चुकीचा फीर्मिनोने फायदा घेत लीवरपुलला १-२ अशी अजेय बढत मिळवुन दिली. या बरोबरच दोन्ही लेग मिळुन लीवरपुलने १-५ असा सिटीचा पराभव करत उपांत्य फेरीत आपले स्थान पक्के केले.
दूसरीकडे पहिल्या लेगच्या ४-१ अश्या आघाडीने मैदानात उतरलेला बार्सेलोनाचा संघ आज उपांत्य फेरीत स्थान मिळवेल असे सगळ्यांनी गृहीत धरले असतानाच रोमाने ६ मिनिटात गोल करत बार्सेलोनाला धक्का दिला. पहिला हाफ त्यांनी पूर्णपणे वर्चस्व गाजवले. बार्सेलोनाला संधी तयार करण्यात सुद्धा यश मिळत नव्हते. फक्त एकच वेळा त्यांना बाॅल टार्गेटवर मारण्यात यश मिळाले. 
दूसऱ्या हाफला बार्सेलोना गोल करेल असे वाटत असताना ५८ व्या मिनिटला पीकेच्या टॅकलवर रोमाला पेनल्टी मिळाली आणि त्याचे गोलमध्ये रुपांतर करत त्यांनी २-० ती आघाडी घेतली. ८३ व्या मिनिटला रोमाने सामन्यातला तिसरा गोल करत सामना ३-० वर आणला. दोन्ही लेग मिळून ४-४ स्कोर असताना रोमाकडे अवेगोलचा फायदा होता. बार्सेलोनाने अटॅकला सुरुवात केली पण त्यांना यश मिळाले नाही.
सामना ३-० नेच संपला आणि रोमाने फुटबाॅलच्या इतिहासात आपले नाव कोरले. बार्सेलोनाच्या खराब प्रदर्शनापेक्षा रोमाचा खेळ जास्त चांगला होता आणि त्यामुळेच बार्सेलोनाला युसीएल मधुन सलग तिसर्यांदा बाहेर पडावे लागले.