२३८व्या एस क्लासिकोमध्ये बार्सिलोना राखणार का आपला लीगमधील विजयाचा सिलसिला कायम ?

बार्सिलोनाच्या संपुर्ण हंगामात अपराजित राहण्याचा विक्रमामध्ये सर्वात मोठा असलेला अडखळा आज दूर होऊ शकतो. आज बार्सिलोनाच्या घरच्या मैदानावर (कॅम्प नाऊ) फुटबाॅल इतिहासातील सर्वात मोठी समजली जाणारी एल क्लासिकोची लढत आहे.

बार्सिलोने लीगचे विजेतेपद मागील सामन्यातच पक्के केले असून आज ते आपला अपराजित राहण्याचा विक्रम कायम ठेवण्याच्या उद्देशाने मैदानात उतरेल तर रियल मॅद्रिदसमोर बार्सिलोनाचा अपराजित रथ रोखण्याचे आव्हान असेल.

आज रात्री होणारी २३८वी एल क्लासिको असेल. या आधी झालेल्या २३७ क्लासिकोमध्ये ९५ वेळा रियल मॅद्रिद ९३ वेळा बार्सिलोना विजयी झाले आहेत तर ४९ सामने बरोबरीत सुटले आहेत. क्लासिकोमध्ये सर्वाधिक गोल्सच्या यादीत मेसी २५ गोल्ससह पहिल्या स्थानावर आहे तर रोनाल्डोच्या नावावर १७ गोल्स आहेत.

मेस्सीने ३७ सामन्यात २५ गोल्स केले असून त्यात १७ सामन्यात विजय मिळवला असून १२ सामन्यात पराभव झाला आहे तर ८ सामने बरोबरीत सुटले आहेत.

रोनाल्डोने ३२ सामन्यात १७ गोल्स केले असून मॅद्रिदला ९ सामन्यात विजय आणि १५ सामन्यात पराभवाचे तोंड पहावे लागले आहे. तर ८ सामने बरोबरीत सुटले आहेत.

मेस्सीच्या नावे १६ तर रोनाल्डोच्या नावे १ असिस्ट आहे.

ला लीगाच्या ८९ वर्षाच्या कारकिर्दित फक्त दोनच खेळाडूंना ३० पेक्षा जास्त वेळा हॅट्रिक केली आहे. मेस्सीच्या नावे ३० तर रोनाल्डोच्या नावे ३४ हॅट्रिक आहेत.

वाचा- धोनी-रोहित शर्माला युसुफ पठाण पडला भारी

बार्सिलोना संघ लीगमध्ये ३४ सामन्यात २६ विजय ० पराभव आणि ८ बरोबरीसह ८६ गुण घऊन पहिल्या स्थानावर आहे. तर रियल मॅद्रिद ३४ सामन्यात २१ विजय ५ पराभव आणि ८ सामने बरोबरीत सोडवून ७१ गुणांसह तिसर्या क्रमांकावर आहे.

या मोसमात दोन्ही संघांतर्फे सर्वाधिक गोल्स करणारे खेळाडू खालील प्रमाणे:-
बार्सिलोना
मेस्सी (३२)
सुवारेझ (२३)
पाॅलिन्हो (८)
रियल मॅद्रिद
रोनाल्डो (२५)
बेले (१२)
इस्को (६)

सामना आज रात्री १२.१५ वाजता प्रक्षेपित होणार असून डीडी स्पोर्ट्सवर सुद्धा थेट प्रक्षेपण होणार आहे.

वाचा- पृथ्वी शाॅची धमाकेदार कामगिरी सुरूच, आज आणखी एक नवा विक्रम