एफ.सी. बार्सेलोनाचे ट्विटर अकॉऊंट हॅक

जगातील सर्वात लोकप्रिय फुटबॉल क्लब पैकी एक असणारा एफ.सी. बार्सेलोना क्लबला रात्री एका वेगळ्याच समस्येला सामोरे जावे लागले. मैदानाप्रमाणेच सोशल मीडियावर दबदबा असणाऱ्या ह्या क्लबचे ट्विटर अकाउंट हाक झाले.

या संघाचे ट्विटर अकाउंट हे कोणीतरी अज्ञात व्यक्तीने हॅक केले आहे. या बाबतची अधिकृत घोषणा या क्लबच्या वतीने करण्यात अली आहे.

या क्लबचे ट्विटरवर २३.१ मिलियन फॅन्स आहेत. तर जगात सार्वधिक ट्विटर फॉलोवर्स असणाऱ्या अकाउंटमध्ये हा क्लब ६२व्या क्रमांकावर आहे.

जेव्हा हे अकाउंट हॅक झाले तेव्हा यावरून अँजेलो डी मारिया या खेळाडूचे स्वागत करण्यात आल्याचा ट्विट करण्यात आला होता. नंतर पुन्हा हे ट्विटर अकाउंट पूर्ववत करण्यात आले.

यापूर्वीही अनेक खेळाडू आणि संघांची ट्विटर अकाउंट हॅक करण्यात आली आहेत. भारतीय खेळाडूंमध्ये मिताली राजचेही अकाउंट गेल्या महिन्यात हॅक करण्यात आले होते.

अकाउंट हॅक झाल्यानंतर अनेक ट्विट करण्यात आले होते ते हे: