बार्सेलोना संघाचा सलग सहावा विजय

काल मध्यरात्री झालेल्या ला लिगाच्या सामन्यात बार्सेलोना संघाने गिरोना या संघाचा ३-० पराभव केला. ला लिगामध्ये पहिल्या स्थानावर असणाऱ्या बार्सेलोनाचा सलग सहा सामन्यातील सलग सहावा विजय ठरला आहे. या सामन्यात बार्सेलोना संघाकडून उत्तम सांघिक खेळाचे प्रदर्शन झाले.

पहिल्या सत्रात सुरुवातीला बार्सेलोना संघाकडून आक्रमणे सुरु झाली. बार्सेलोना संघाचा मागील काही सामन्यातील खेळ पाहता या सामन्यत त्याच्या विरुद्ध संघाने खूप सावध पवित्रा घेत डिफेन्सिव्ह खेळ करण्यावर जास्त भर दिला. बार्सेलोना संघाला १५ व्या मिनिटाला कॉर्नर मिळाला. मेस्सीने कॉर्नर घेतला. त्याने बॉल बॉक्सच्या डाव्या कोपऱ्यात असणाऱ्या जोर्डी अलाबाकडे मारला. अलाबाने त्या व्हालीवर किक केली आणि गिरोनाच्या खेळाडूचे डिफ्लेक्शन घेत फुटबॉल गोल जाळ्यात गेला. बार्सेलोना संघाने १-० अशी बाधत मिळवली. या गोलनंतर दोन्ही संघाकडून आक्रमणे झाली त्यात देखील बार्सेलोनाचा वरचष्मा राहिला. परंतु पहिले सत्र संपले तोपर्यंत दुसरा गोल होऊ शकला नाही.

दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीच्याच मिनिटामध्ये बार्सेलोना संघातील मास्केरॅनो याने बॉल चीप करत गिरोनाच्या डिफेंडर्सच्या वरून पुढे किक केली. त्यावेळी लियोनल मेस्सीला गोल करण्याची धूसर संधी मिळाली. मेस्सी खूप चांगला रन घेत बॉल पर्यंत पोहचला पण ऐनवेळी गिरोनाचा गोलकीपर गोरका पुढे आला आणि त्याने बॉल थोपवण्यात यश मिळवले. ४७ व्या मिनिटाला बार्सेलोना संघातील अॅलेक्स विडाल आणि सुआरेजने उत्तम चाल रचली आणि गोल केला. बार्सेलोना संघाने २-० अशी आघाडी मिळवली.

६८ व्या मिनिटाला सिर्गिओ रॉबर्टो याने एक उत्तम लॉन्ग पास केला त्यावर गिरोनाच्या सर्व डिफेंडर बीट झाले होते. तो बॉल सुआरेजने मिळवाल आणि गोलकीपरला चुकवत बार्सेलोनाचा तिसरा आणि स्वतःचा पहिला गोल केला. त्यानंतर या सामन्यात आणखी गोल होऊ शकला नाही. सामना ३-० असा बार्सेलोना संघाने जिंकला.

यदाकदाचित आपणास माहिती नसेल तर-

# गिरोन संघाचा सध्याचा गोलकीपर गोरकायाच्या विरुद्ध गोल करण्यास अद्याप मेस्सीला अपयश आले आहे.

# मागील सामन्यात चार गोल केल्यानंतर मेस्सी या सामन्यात एकही गोल करू शकला नाही.