ला लीगा: बार्सेलोना संघाने केली मागील मोसमातील पराभवाची परतफेड

आज पहाटे ला लीगामध्ये कैम्प नाऊ येथे पहिल्या स्थानावर असणाऱ्या बार्सेलोना आणि शेवटच्या स्थानावर असणाऱ्या मलागा या संघात सामना झाला. हा सामना बार्सेलोना संघाने २-० असा जिंकला. बार्सेलोनासाठी गेरार्ड डययूलोफेयू आणि आंद्रे इनिएस्टा यांनी गोल केले.

या सामन्यात लियोनल मेस्सीने मिडफिल्डमध्ये खूप मेहनत घेतली पण तो गोल करण्यात अपयशी ठरला. मागील मोसमात मलागाला एकदाही हरवण्यात बार्सेलोनाला यश आले नव्हते.

आपल्या डिफेन्सिव्ह खेळासाठी प्रसिद्ध असलेल्या मलागाने सुरुवातीपासूनच डिफेन्सिव्ह खेळावर भर दिला. परंतु त्याचा फायदा मात्र झाला नाही. सामना सुरु होऊन अवघे २ मिनिटे झाली होते तेव्हा मेस्सीने लेफ्ट विंगवर असणाऱ्या लुकास डीग्नेकडे पास केला.

त्या पासावर ताबा मिळवत लुकासने बॉल क्रॉस इन केला आणि सिक्स यार्ड बॉक्समध्ये असलेल्या गेरार्ड डययूलोफेयू याने स्वतःच्या बार्सेलोना पहिला आणि आपल्या बार्सेलोना सिनियर टीम सोबतच्या कारकिर्दीतील पहिला गोल केला.

पहिल्या गोलसाठी लुकासने जेव्हा बॉल इन केला तेव्हा बॉल लाईनच्या बाहेर गेला होता आणि त्यानंतर गेरार्ड डययूलोफेयू याने गोल केला. पहिला गोल अवेध्य ठरवण्यात यावा म्हणून मलागाचे खेळाडू रेफ्रीकडे धाव घेत होते पण रेफ्रीने त्यावर कोणताच आक्षेप घेतला नाही.

या गोलनंतर मलागाने जास्तीतजास्त खेळाडू डिफेन्समध्ये लावले आणि बार्सेलोनाचा दुसरा गोल होणार नाही याची दक्षता घेतली. पहिले सत्र संपले तेव्हा बार्सेलोना संघ १-० असा आघाडीवर होता.

दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीनंतर काही काळ दोन्ही संघानेआक्रमने केली त्यात बार्सेलोना संघाला यश आले. लियोनल मेस्सी आणि इनिएस्टा या जोडीने चाल रचली. मेस्सीने लेफ्ट विंगवर इनिएस्टाला पास केला आणि इनिएस्टाने डीमध्ये प्रवेश करत किक केली.

मलागाच्या डिफेंडरच्या पायाला डिफ्लेक्ट होऊन बॉल गोल जाळ्याच्या वरच्या कोपऱ्यात जाऊन विसावला.५५ व्या मिनिटाला झालेल्या या गोलमुळे सामन्याचे चित्र स्पष्ट झाले. बार्सेलोनाने २-० अशी आघाडी घेतली.

दुसऱ्या गोलनंतर बार्सेलोना संघाने खूप चाली रचल्या पण ते मलागाचा डिफेन्स भेदण्यात सातत्याने अपयशी ठरत गेले. बार्सेलोनाचा स्ट्रायकर लुईस सुआरेजला आजच्या सामन्यात देखील गोल करण्यात अपयश आले.

या मोसमात खेळताना त्याने फक्त तीन गोल केले आहेत. हा सामना जिकंत बार्सेलोनाने ला लीगाच्या या मोसमात ९ सामन्यात ८ विजय तर एक सामना बरोबरीत राखून २५ गुण मिळवले आहेत.