श्वाइनस्टायगरचा युनाइटेडला अलविद

0 54

जर्मनी आणि मँचेस्टर युनिटेडचा मधल्या फळीतील अनुभवी खेळाडू बॅस्टियन श्वाइनस्टायगर युनाइटेडला अलविदा करून शिकागो फायर संघासाकडे रावाना झाला आहे. ३२ वर्षीय श्वाइनस्टायगरने २०१५ साली मँचेस्टर युनाइटेड मध्ये प्रवेश केला होता, पण ज्या प्रकारे त्याच्याकडून अपेक्षा होत्या तसा खेळ पहायला मिळाला नाही. बॅस्टी, असे संबोधल्या जाणाऱ्या श्वाइनस्टायगरला म्हणावी तशी संधी सुद्धा युनाइटेड संघाकडून मिळाली नाही अशी काहीशी टीकाही झाली.

शिवाय सतत दुखापतींनी ग्रासलं असल्यामुळे तो सर्वोत्तम क्षमतेने खेळू शकत होता का नाही, ही देखील विचारात घेण्याची बाब आहे. श्वाइनस्टायगर युनाइटेड मध्ये प्रवेश करण्यापूर्वी बायर्न म्युनिक संघाकडून १५ वर्ष खेळला.

 

श्वाइनस्टायगरचे आजवरचे विक्रम:

जर्मनीकडून खेळताना २४ गोल

बुंडेसलीगा विजेतेपद ८ वेळा

जर्मन कप विजेतेपद ७ वेळा

चॅम्पियन्स लीग विजेतेपद १ वेळा

Comments
Loading...
%d bloggers like this: