अबब! विराट आजपर्यंत आयपीएलमध्ये तब्बल ४१ किलोमीटर धावला

मुंबई |भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा आयपीएलमध्ये बेंगलोर संघाचा कर्णधार आहे. हा खेळाडू अायपीएलच्या सर्व मोसमात बेंगलोर संघाकडून खेळला आहे. 

तो आयपीएलच्या सर्व मोसमात मिळून सर्वाधिक धावा (४६१९ धावा ) करणारा खेळाडू आहे. या धावा करताना त्याने तब्बल ४०.५०० किलोमीटरचे अंतर कापले आहे. तेही केवळ स्वत: फलंदाजीवर धावा करताना. 

त्याने ज्या ४६१९ धावा करताना त्याने खेळपट्टीवर ४४१९८ यार्ड किंवा ४०४१५ मीटर अंतर पार केले आहे. 

त्याच्या ४६१९ धावांत १४७२ धावा एकेरी, २५१ दुहेरी आणि ११ वेळा तीन धावा काढल्या आहेत.

अायपीएल २०१८मध्येही त्याने आजपर्यंत १.६७ किलोमीटर अंतर पार केले आहे. तोच या यादित अव्वल आहे.