या कारणामुळे बीसीसीआय नाराज, धोनीसाठी धोक्याची घंटा

बीसीसीआयमध्ये काही दिवसांपासून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. भारतीय महिला क्रिकेटपटू मिताली राजने बीसीसीआयला लिहलेले पत्र मिडियामध्ये उघडकीस आले असून त्याने गोंधळ निर्माण झाला आहे.

त्यातच भारतीय क्रिकेट संघाचा यशस्वी कर्णधार एमएस धोनीने एशिया कपमध्ये संघाचे नेतृत्व केल्याने बीसीसीआयच्या प्रशासकांनी नाराजी व्यक्त केली होती.

यावर्षी सप्टेंबर महिन्यात अरब अमिरातीमध्ये झालेल्या एशिया कपच्या अफगानिस्तान विरुद्धच्या वन-डे सामन्यात धोनीने कर्णधारपदाची भुमिका पार पाडली होती. या स्पर्धेसाठी नियमित कर्णधार विराट कोहलीला विश्रांती देण्यात आल्याने रोहित शर्माने नेतृत्वाची जबाबदारी पार पाडली होती.

या स्पर्धेत भारताने बांगलादेश आणि पाकिस्तानला पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. तर दुबईत झालेल्या अफगानिस्तान विरुद्धच्या सामन्यात शर्मा बरोबरच शिखर धवनही संघात नव्हता. यामुळे धोनीने या सामन्यात संघाचे नेतृत्व केले.

शर्माच्या अनुपस्थितीत कर्णधारपदाची भुमिका पार पाडताना धोनीचा हा 200वा वन-डे सामना ठरला होता. तसेच 200 वन-डे सामन्यात कर्णधार पद भुषवणारा तो ऑस्ट्रेलियाच्या रिकी पॉटींग आणि न्यूझीलंडच्या स्टीफन फ्लेमिंग नंतरचा तिसराच क्रिकेटपटू ठरला.

अफगानिस्तान विरुद्धच्या सामन्यात धोनी खेळला म्हणून चाहते जरी खूष असले तरी बीसीसीआय मात्र नाखूष होती.

टीओआयच्या रिपोर्टनुसार, बीसीसीआयचे प्रशासक धोनीने नेतृत्व करण्याच्या विरोधात होते. त्यांच्या मते संघातील दुसऱ्या वरिष्ठ खेळाडूने नेतृत्व करावे. धोनी जानेवारी 2017ला संघाच्या कर्णधार पदावरून पायउतार झाला होता. तर 200 वन-डे सामन्यात संघाचे नेतृत्व करताना भारताने 110 सामन्यांत विजय मिळवला तर पाच सामने अनिर्णीत राहिले.

200व्या वन-डे सामन्यात धोनीने नेतृत्व करताना तो सामना बरोबरीत सुटला. तर रोहितने संघात परत आल्यावर बांगलादेश विरुद्धच्या अंतिम सामन्यात संघाला सातवे विजेतेपद मिळवून दिले.

महत्त्वाच्या बातम्या:

टीम इंडियाला मोठा झटका, पृथ्वी शाॅ पहिल्या कसोटीतून बाहेर

२०१९ आयपीएलसाठी मुंबई इंडियन्स संघातील या खेळाडूला मिळणार सर्वाधिक रक्कम

हॉकी विश्वचषक २०१८: आज चीन समोर असणार बलाढ्य इंग्लंडला रोखण्याचे आव्हान