कसोटी मालिकेत शानदार विजय मिळणारी टीम कोहली होणार मालामाल

भारतीय संघाने सोमवारी ऑस्ट्रेलिया विरुद्ध ऑस्ट्रेलियामध्ये पहिल्यांदाच कसोटी मालिका जिंकण्याचा इतिहास रचला आहे. त्यानंतर आता बीसीसीआयही भारतीय संघातील खेळाडू, प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफला रोख बक्षीस देणार आहे.

यामध्ये खेळाडूंना मॅच फि एवढीच रोख बक्षीस मिळणार आहे. अंतिम 11 जणांच्या संघात असणाऱ्या खेळाडूंना 15 लाख रुपये तर संघातील अन्य खेळाडूंना 7.5 लाख रुपये असे रोख बक्षीस मिळणार आहे.

त्याचबरोबर प्रशिक्षकांना 25 लाख रुपये रोख बक्षीस दिले जाणार आहे. तर सपोर्ट स्टाफला प्रत्येक सामन्यात मिळणाऱ्या प्रोफशनल फी इतकीच रोख बक्षीस दिले जाणार आहे.

भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेत अॅडलेड येथे झालेल्या पहिल्या आणि मेलबर्न येथे झालेला तिसऱ्या सामन्यात विजय मिळवला होता. तर पर्थ येथे झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताला पराभव स्विकारावा लागला होता.

त्यानंतर सिडनीला झालेला शेवटचा कसोटी सामना पावसाच्या व्यत्ययामुळे अनिर्णित राहिला. त्यामुळे ही मालिका भारताने 2-1 अशी जिंकली.

ही मालिका जिंकल्याने भारतीय संघाने कसोटी क्रमवारीतील पहिले स्थान भक्कम केले आहे. आता भारतीय संघ 12 जानेवारीपासून ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडे मालिका खेळणार आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या-

कसोटी मालिकेतील शानदार प्रदर्शनानंतरही बुमराह खेळणार नाही वनडे मालिका

गुरुजी शास्त्रींचं पुन्हा धाडसी विधान, ऐकून व्हाल अवाक्

जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडिअम बनत आहे भारतात