Breaking: न्यूजीलँड विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा

पुणे । न्यूजीलँड संघाविरुद्ध होणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी आज भारतीय संघाची घोषणा झाली. यात शिखर धवन या सलामीवीराने कमबॅक केले आहे तर दिनेश कार्तिक आणि शार्दूल ठाकूरला पुन्हा संधी देण्यात आली आहे.

शिखर धवन श्रीलंका वनडेतील शेवटच्या सामन्यात पत्नी आजारी असल्यामुळे तर ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेत आई आजारी असल्यामुळे भाग घेऊ शकला नव्हता.

शार्दूल ठाकूरला ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेत वगळण्यात आले होते. परंतु त्याला या मालिकेत पुन्हा संधी देण्यात आली आहे.

रवींद्र जडेजा आणि आर अश्विन यांना या मालिकेसाठीही वगळण्यात आले आहे. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि उमेश यादव यांनाही या मालिकेत वगळण्यात आले आहे.

भारतीय संघ: विराट कोहली(कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), अजिंक्य रहाणे, मनीष पांडे, केदार जाधव, दिनेश कार्तिक, एमएस धोनी, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेन्द्र चहल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, शार्दूल ठाकूर