भारतीय संघाची चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी घोषणा

आज भारतीय क्रिकेट संघाची चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी निवड करण्यात आली. अपेक्षेप्रमाणे भारतीय संघाचं नेतृत्व भारताचा सर्व क्रिकेट प्रकारातील कर्णधार विराट कोहलीकडे देण्यात आले आहे.

महसूल वाटपाच्या मुद्द्यावरुन आयसीसीसोबत बीसीसीआयचा वाद सुरु आहे. दिनांक २५ एप्रिल ही आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघ निवडीची यादी पाठवण्याची अखेरची तारीख असूनही बीसीसीआयने आजपर्यंत संघाची घोषणा केली नव्हती. त्यामुळे भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सहभागी होणार की नाही याबद्दल मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. परंतु काल रविवारी बीसीसीआयची विशेष सर्वसाधारण बैठक दिल्ली येथे पार पडली आणि त्यात सोमवारी संघ निवडीचा निर्णय घेण्यात आला होता.

लोढा समितीने नेमलेल्या प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय, भारतचे माजी कर्णधार सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड तसेच भारतचा प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी संघ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाठविण्याची भूमिका घेतली होती. त्यामुळे मोठा पेच निर्माण झाला होता. परंतु आज अखेर या सर्व वादावर पडदा पडून भारतीय संघाची अधिकृत घोषणा करण्यात आली.

रोहित शर्मा आणि शिखर धवन सलामीवीर तर रहाणे सलामीच्या फलंदाजांसाठी बॅकअप 

दुखापतग्रस्त केएल राहुलला अपेक्षेप्रमाणे संघात घेण्यात आलेले नाही. सध्या जबदस्त लयीत असणाऱ्या गौतम गंभीर, दिनेश कार्तिक, शिखर धवन आणि पार्थिव पटेल यापैकी केएल राहुललाच्या जागी शिखर धवनला  संधी देण्यात आली आहे.

२०१४ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये जबदस्त प्रदर्शन केलेल्या आणि आयपीएलमध्ये चांगलं कमबॅक केलेल्या रोहित शर्माची अपेक्षेप्रमाणे सलामीचा फलंदाज म्हणून निवड करण्यात आली आहे.

२८ वर्षीय अजिंक्य राहणे याचीही संघात सलामीच्या फलंदाजांना पर्याय म्हणून निवड फलंदाज म्हणून निवड करण्यात आली आहे. भारतीय संघाने राहणेच्याच नेतृत्वाखाली धरमशाला कसोटीमध्ये विजय मिळवला होता. तसेच ह्या मुंबईकर खेळाडूने इंग्लंडच्या भूमीवर आजपर्यंत अतिशय चांगलं प्रदर्शन केलं आहे.

गौतम गंभीरच्या नावावर बैठकीमध्ये कोणतीही चर्चा झाली नाही. 

तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकासाठी अपेक्षेप्रमाणे कर्णधार विराट कोहली, अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग आणि माजी कर्णधार एमएस धोनीच्या नावाची घोषणा झाली. भारताचा माजी कर्णधार असलेला एमएस धोनीकडे यष्टिरक्षकाची जबाबदारी असेल.

महाराष्ट्राच्या रणजी संघातून खेळणाऱ्या एकमेव खेळाडूला अर्थात अष्टपैलू केदार जाधवला भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे. इंग्लंड विरुद्ध झालेल्या एकदिवसीय मालिकेत केदार जाधवने ३ सामन्यात तब्बल २३२ धावा केल्या होत्या. त्यामुळेच तो मालिकाविरही ठरला होता. ह्याच कामगिरीमुळे त्याला संघात स्थान देण्यात आले.

ज्या फलंदाजांची भारतीय संघात येण्यासाठी गेले कित्येक महिने चर्चा होत होती त्या मनीष पांडेला अखेर भारतीय संघात स्थान देण्यात आले. आयपीएल आणि देशांतर्गत स्पर्धांमध्ये जबरदस्त कामगिरी केल्यामुळेच त्याला भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे. अष्टपैलू हार्दीक पांड्याचाही भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे.

भारतीय संघाची गोलंदाजीची मदार या खेळाडूंवर असेल!

आर अश्विन पूर्णपणे फिट

दुखापतीमुळे आयपीएलमध्ये खेळू न शकलेला फिरकी गोलंदाज आर अश्विन पूर्णपणे फिट असून चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळण्यासाठी तयार आहे.आर अश्विन, रवींद्र जडेजा हे कसोटी क्रमवारीत वरच्या स्थानावर असलेले आणि भारतीय संघाचे खऱ्या अर्थाने फिरकी गोलंदाजीचे कणा असलेल्या अष्टपैलू जोडीवर विश्वास ठेवत निवड समितीने दोघांचीही संघात निवड केली आहे.

भारतीय वेगवान माऱ्याची मदार ही उमेश यादव, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांच्यावर असेल.

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी स्टॅण्डबाय खेळाडू

रिषभ पंत, कुलदीप यादव, शार्दूल ठाकूर, सुरेश रैना आणि दिनेश कार्तिक यांना संघात स्थान देण्यात आलेले नाही. परंतु या खेळाडूंचा चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी स्टॅण्डबाय खेळाडू म्ह्णून विचार करण्यात आलेला आहे.

 

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ

रोहित शर्मा, शिखर धवन,  विराट कोहली( कर्णधार ), युवराज सिंग, अजिंक्य रहाणे, एमएस धोनी (यष्टीरक्षक ),  केदार जाधव, हार्दिक पांड्या, मनीष पांडे, आर अश्विन, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह