ऑस्ट्रेलिया महिला संघाच्या भारत दौऱ्याचे आणि तिरंगी टी २० मालिकेचे वेळापत्रक जाहीर

आज बीसीसीआयने ऑस्ट्रेलिया महिला संघाच्या भारत दौऱ्याचे आणि तिरंगी टी २० मालिकेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. ऑस्ट्रेलियाचा महिला क्रिकेट संघ मार्च २०१८ मध्ये भारत दौऱ्यावर येणार आहे. तसेच भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड महिला संघांमध्ये मार्च- एप्रिल २०१८ मध्ये तिरंगी टी २० मालिका रंगणार आहे.

ऑस्ट्रेलिया महिला संघाच्या या दौऱ्यात ऑस्ट्रेलिया संघ भारतीय महिला संघाविरुद्ध ३ वनडे सामने खेळणार आहेत. ही ३ सामन्यांची वनडे मालिका २०१७ ते २०२० मध्ये होणाऱ्या आयसीसी महिला चॅम्पिअनशिपचा भाग असेल.

ही मालिका १२ मार्च पासून सुरु होणार आहे. त्याआधी ऑस्ट्रेलिया संघ मुंबईत २ सराव सामने खेळेल. तसेच या वनडे मालिकेतील तीनही सामने बडोद्याला होणार आहेत.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (महिला) वनडे मालिकेनंतर २२ मार्च २०१८ पासून तिरंगी टी २० मालिका सुरु होणार आहे. या मालिकेचा अंतिम सामना ३ एप्रिल २०१८ ला खेळवण्यात येईल. या मालिकेतील सर्व सामने मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडिअमवर होणार आहेत.

ऑस्ट्रेलिया महिला संघ भारत दौरा (२०१८):

६ मार्च – पहिला सराव सामना (भारत महिला अ संघाविरुद्ध) – मुंबई
८ मार्च – दुसरा सराव सामना – ( भारत महिला अ संघाविरुद्ध ) – मुंबई

वनडे मालिका (भारत महिला संघ विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला संघ)

१२ मार्च – पहिला सामना – बडोदा
१५ मार्च – दुसरा सामना – बडोदा
१८ मार्च तिसरा सामना – बडोदा

तिरंगी टी २० मालिका २०१८ (भारत, ऑस्ट्रलिया आणि इंग्लंड महिला संघ)

२२ मार्च – भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया – मुंबई
२४ मार्च – ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लड – मुंबई
२६ मार्च – भारत विरुद्ध इंग्लंड – मुंबई
२८ मार्च – भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया – मुंबई
३० मार्च – ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लड – मुंबई
१ एप्रिल – भारत विरुद्ध इंग्लंड – मुंबई
३ एप्रिल – अंतिम सामना – मुंबई