दक्षिण आफ्रिका विरुद्ध होणाऱ्या टी २० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा; या मोठ्या खेळाडूचे झाले पुनरागमन

बीसीसीआयने आज दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या टी २० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३ सामन्यांची टी २० मालिका खेळणार आहे. ही मालिका १८ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे.

आज जाहीर झालेल्या संघात सुरेश रैनाने भारतीय संघात पुनरागमन केले आहे. त्याने नुकत्याच पार पडलेल्या सईद मुश्ताक अली टी २० ट्रॉफीमध्ये उत्तम कागिरी केली होती. त्याने बंगाल विरुद्ध ५९ चेंडूत १२६ धावांची खेळी केली होती. तसेच बडोदा आणि तामिळनाडू विरुद्ध अर्धशतकी खेळी केल्या होत्या. याच कामगिरीच्या जोरावर त्याचे भारतीय संघात पुनरागमन झाले आहे.

असा आहे टी २० मालिकेसाठी भारतीय संघ:
विराट कोहली(कर्णधार), रोहित शर्मा(उपकर्णधार),शिखर धवन, केएल राहुल, सुरेश रैना, एम एस धोनी, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, मनीष पांडे, अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, जयदेव उनाडकट, शार्दूल ठाकूर.