पहिल्यांदाच प्रशिक्षकाला मिळणार खेळाडूंपेक्षा जास्त बक्षीस

भारताने ऑस्ट्रेलियावर १९वर्षाखालील क्रिकेट विश्वचषकात ८ विकेट्सने विजय मिळवला. भारताने विक्रमी चौथ्यांदा हा विश्वचषक जिंकत विक्रम केला आहे. याचमुळे भारतीय क्रिकेट बोर्डाने खेळाडू, प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफला बक्षीस जाहीर केले आहे.

यात प्रशिक्षक राहुल द्रविड यांना ५० लाख रुपये, खेळाडूंना प्रत्येकी ३० लाख रुपये आणि सपोर्ट स्टाफला प्रत्येकी २० लाख रुपये देण्यात येणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या समितीने ही बक्षिसांची घोषणा केली असून या समितीचे प्रमुख विनोद राय यांनी संघाचे कौतुक केले आहे.

“मी भारतीय संघाचं अभिनंदन करतो. राहुल द्रविडने या विजयात मोलाची भूमिका बजावली आहे. ते एक चांगले खेळाडू असून ते खेळाचे एक चांगले राजदूत आहे. मला खात्री आहे की हे खेळाडू कठोर मेहनत घेऊन वरिष्ठांच्या संघात स्थान मिळवतील. ” असे ते म्हणाले.

नेहमी खेळाडूंना बक्षीस म्हणून जी रक्कम मिळते त्यापेक्षा कमी रक्कम ही प्रशिक्षकाला आजपर्यंत देण्यात असे . परंतु यावेळी प्रथमच प्रशिक्षकाला जास्त बक्षीस देऊन बीसीसीआयने एक चांगला पायंडा पाडला आहे.