प्रशिक्षक पदासाठी भारतीय खेळाडूंची मतं विचारात घेतली जाणार

भारतीय क्रिकेट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी जमैकामध्ये भारताचा कर्णधार विराट कोहली आणि इतर टीम मधील खेळाडूंची भेट घेणार आहेत. त्यासाठी ते जमैका येथे दाखल झाले आहेत.

सध्या भारतीय क्रीडाजगतात प्रशिक्षक पदावरून मोठी चर्चा सुरु आहे. पुढे जाऊन कोणते वाद नकोत यासाठी भारतीय क्रिकेट बोर्ड मोठ्या प्रमाणावर काळजी घेत असल्याचं दिसत आहे. याचमुळे नवीन प्रशिक्षकासाठी विराट कोहली व इतर खेळाडूनकडून अभिप्राय घेतला जात असल्याचं बोललं जात आहे.

भारतीय क्रिकेट बोर्डाच्या क्रिकेट सल्लागार समितीचे सदस्य सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली व व्हीव्हीएस लक्ष्मण येत्या १० तारखेला नवीन प्रशिक्षकांच्या मुलाखती घेणार आहेत. ९ जुलै प्रशिक्षकपदासाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत आहे.