आयपीएल उदघाटन प्रसंगी फॅब ५ चा होणार सन्मान

0 61

भारतीय संघाचे एकेकाळचे फॅब ५ म्हणून ओळखले जाणारे सचिन, गांगुली, राहुल द्रविड, लक्ष्मण आणि सेहवाग यांचा आयपीएल उदघाटन प्रसंगी सन्मान होणार आहे. गुरुवारी आयपीएलच्या अधिकारी मंडळाने हा निर्णय घेतला.
आयपीएलची आज मिटिंग झाली त्यात हा निर्णय झाला. याबद्दल बोलताना आयपीएलचे चेअरमन राजीव शुक्ला म्हणाले कि, ” हैद्राबाद येथे होणाऱ्या उदघाटन समारंभात सचिन, गांगुली, राहुल द्रविड, लक्ष्मण आणि सेहवाग यांचा हा सत्कार होणार आहे. आयपीएलची सुरुवात ५ एप्रिल रोजी हैद्राबाद येथे होणार आहे.”

फॅब ५ पैकी लक्ष्मण सोडून बाकी चारही खेळाडूंनी भारताचे नेतृत्व केले आहे. भारताच्या यशात आणि त्याच कालखंडात जबदस्त कामगिरी करणाऱ्या भारताच्या माजी कर्णधार आणि सध्याच्या प्रशिक्षक असणाऱ्या अनिल कुंबळेला यात स्थान का देण्यात आले नाही. याचे कारण समजू शकले नाही.

Comments
Loading...
%d bloggers like this: