बीसीसीआयने मागवले प्रशिक्षक पदासाठी नव्याने अर्ज, अनिल कुंबळेला मिळू शकतो डच्चू?

भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक अनिल कुंबळेचा करार हा चॅम्पियन्स ट्रॉफी नंतर संपत असल्याकारणाने बीसीसीआयने प्रशिक्षक पदासाठी नव्याने अर्ज मागवले आहेत. यामध्ये सध्याचा प्रशिक्षक अनिल कुंबळे पुन्हा प्रशिक्षक बनायचं असेल तर थेट भाग घेऊ शकतो.

सध्या भारतीय टीम इंग्लंडला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी रवाना होत असून संघ गतविजेता आहे. प्रशिक्षक करारानुसार कुंबळेचा शेवटचा दौरा असून त्याला पुढे जाऊन पुन्हा प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले जाते का हे पहाणे औत्सुक्याचे ठरेल.

सूत्रांच्या म्हणण्यानुसार बीसीसीआय ही कुंबळेने खेळाडू तसेच स्वतःसाठी सतत केलेलया मोठ्या मानधन वाढीमुळे वैतागले आहेत.
बीसीसीआयने प्रसिद्धीसाठी दिलेल्या पत्रकात असेही म्हटले आहे की आम्ही भारतीय पुरुष क्रिकेट संघासाठी इच्छूक उमेदवारांचे अर्ज मागवले आहेत. ही निवड पूर्णपणे पारदर्शक असेल.

ही पूर्ण प्रोसेस सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या कमिटीच्या मार्गदर्शनाखाली होणार असून प्रशिक्षक निवडीसाठी सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्ही व्ही एस लक्ष्मण हे दिग्ग्ज माजी खेळाडू असणार आहेत.
भारतीय टीमचे हे तीन दिग्गज उमेदवारांची मुलाखत घेणार असून त्यांचं प्रेसेंटेशनपण पाहणार आहेत. त्यातून एका योग्य उमेदवाराची निवड हे त्रिकुट करणार असेल जो भारतीय क्रिकेटला यशाच्या शिखरावर नेऊ शकेल.