विराट कोहलीबरोबर सेल्फी घेणे झाले अवघड !

मुंबई । भारतीय संघ यापुढे विमानात प्रवास करत असताना सेल्फी घेता येणार नाही. जेव्हा भारतीय संघ भारतात सामने खेळत असताना प्रवास करतो तेव्हा हा प्रवास ते इकॉनॉमी क्लासने करतात.

त्यामुळे मोठ्या प्रमाणावर चाहते खेळाडूंच्या सीटपर्यंत येऊन सेल्फी किंवा ऑटोग्राफ मागतात. यामुळे खेळाडूंना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागते.बऱ्याच वेळा खेळाडूंचे स्वातंत्र्य आणि सुरक्षा धोक्यात येते.

बऱ्याच वेळा काही चाहते खेळाडूंनी सेल्फी किंवा ऑटोग्राफ द्यावा म्हणून हट्टाला पेटतात. इकॉनॉमी क्लासमध्ये इशांत शर्मा किंवा हार्दिक पंड्यासारख्या उंच खेळाडूंना बसायला तसेच पायाला त्रास होतो.

विराटसह अन्य खेळाडूंनी हा मुद्दा उचलून धरला तसेच बीसीसीआयच्या निदर्शनास आणून दिला. त्यामुळे बीसीसीआय यात लवकरच यात बदल करणार असून खेळाडूंना बिजनेस क्लासचे तिकीट देऊ शकते.

यामुळे मात्र चाहत्यांना यापुढे विमानात आपल्या आवडत्या खेळाडूंबरोबर फोटो घेणे किंवा ऑटोग्राफ घेणे अवघड जाणार आहे.