सर जडेजाचा १५ खेळाडूंमध्ये एकही बेस्ट फ्रेंड नाही तर…

भारताचा फिरकीपटू रविंद्र जडेजाला आॅस्ट्रेलिया विरुद्ध अॅडलेड ओव्हल मैदानावर झालेल्या पहिल्या कसोटीत सामन्यात अंतिम 11 जणांच्या संघात स्थान मिळाले नव्हते. हा सामना भारताने 31 धावांनी जिंकाला.

या सामन्यादरम्यान जडेजाला मैदानाबाहेर फिरण्यासाठी काही वेळ मिळाला होता. त्यामुळे त्याने तो वेळ त्याच्या बेस्ट फ्रेंड(सर्वात चांगला मित्र) बरोबर घालवला आहे. त्याचा हा मित्र कोणी व्यक्ती नसून चक्क घोडा हा प्राणी आहे.

याचा व्हिडिओ बीसीसीआयने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये जडेजाने त्याच्या घोड्यांच्या आवडीबद्दल काही गोष्टी सांगितल्या आहेत.

जडेजा भारतीय संघाच्या चांगल्या संपर्कात असलेल्या क्रेग न्यूटन यांच्या फार्म हाउसवर गेला होता. न्यूटन यांच्या पत्नीने त्यांच्या फार्म हाउसवर चार घोडे ठेवले आहेत. या घोड्यांना जडेजाने भेट दिली. त्यांच्याबरोबर काही वेळही घालवला आहे.

तसेच त्याने सांगितले आहे की घोड्याबरोबर वेळ घालवल्याने मैदानावरील सर्व थकवा निघून जातो.

जडेजाने त्याच्याकडेही घोडे पाळले असल्याचे सांगितले आहे. त्यातील एका घोड्याचे नाव वीर असेही असल्याचे जडेजाने सांगितले.

त्याचबरोबर जेव्हा त्याच्याकडे घोडे नव्हते तेव्हा तो त्याच्या मित्रांच्या फार्म हाउसवर जाऊन घोड्यांबरोबर वेळ घालवायचा. त्यामुळे त्याला घोड्यांची आवडही लागली आणि त्याच्याबद्दल काही गोष्टींची माहितीही मिळाली, असे जडेजाने सांगितले आहे. तसेच जेवढावेळ घोड्याबरोबर घालवाल तेवढ्या नवीन गोष्टी कळतात असेही जडेजा म्हणाला.

जडेजाने त्याच्या घोड्यांच्या प्रेमापोटी उजव्या हातावर घोड्यांचा टॅट्यूही काढला आहे. पूर्वी त्या हातावर त्याच्या नावाचा टॅट्यू होता, पण त्याने त्याचजागी  घोड्यांचा कायमस्वरुपी टॅट्यू काढून घेतला आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

आयपीएल २०१९चा लिलाव कधी आणि कोणत्या चॅनेलवर पहाल?

एबी डिव्हीलियर्स एक्सप्रेस काही थांबेना! पुन्हा एकदा धमाकेदार खेळी

हा विक्रम पहाच, विश्वास बसेल की भारत आॅस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकणार आहे