कोहली-पेन वादाबद्दल बीसीसीआयने केला मोठा खुलासा

भारताला आज(18 डिसेंबर) ऑप्टस स्टेडीयम, पर्थ येथे पार पडलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध 146 धावांनी पराभव स्विकारावा लागला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली आहे.

या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टिम पेन यांच्यात झालेल्या शाब्दिक चकमकीबद्दल बीसीसीआयने मोठा खुलासा केला आहे.

मिडियामध्ये कोहलीनेच पेनशी शाब्दिक चकमकीला सुरूवात केली होती असे वृत्त फिरत आहे. यामुळेच बीसीसीआयने असे काही झालेच नाही असा रिपोर्ट सादर केला आहे.

याबद्दल बीसीसीआयने स्पष्ट केले आहे की ‘सध्या असे गृहित धरले जात आहे की ‘विराटने पेनला मी सर्वोत्तम खेळाडू असून तू फक्त एक प्रभारी कर्णधार आहेस असे बोलले होते.’ पण विराट असे काहीच बोलला नव्हता.’

याबरोबर पेन आणि विराट यांनीही जे झाले ते मर्यादा सोडून झाले नाही असे म्हटेल असून ते सर्व खेलाडूवृत्तीला धरुनच होते असे म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

Video: इशांत शर्मासाठी ‘पार्ट-टाइम अंपायर’ झाला नॅथन लायन

ऑस्ट्रेलियन भूमीत टीम इंडियाविरुद्ध हा गोलंदाज ठरला सर्वात यशस्वी

कोहलीचा ‘तो’ निर्णय चूकला आणि टीम इंडियाने सामना गमावला…

Video: कोहली-पेन सोडा पण टीम इंडियाचेच हे दोन खेळाडू भिडले मैदानावर…