अशाप्रकारे पुढच्या ५ वर्षात बीसीसीआयला मिळणार २५ हजार कोटी रुपये!

भारतीय क्रिकेट बोर्डाचे भारतात होणाऱ्या क्रिकेट सामन्यांच्या प्रसारणाचे हक्क काल स्टार इंडिया कंपनीने तब्बल ६१३८.५ कोटी रुपयांना विकत घेतले. याबरोबर आयपीएल आणि भारतात होणाऱ्या सामन्यांच्या प्रसारणाचे हक्क आता स्टार इंडियाकडे आले आहेत. 

आयपीएलचे प्रसारणाचे हक्क सप्टेंबर महिन्यात ‘स्टार इंडिया’ने तब्बल १६ हजार ३४७ कोटी रुपयांची बोली लावत मिळवले होते. हे हक्कही २०१८ ते २०२३ या काळासाठी होते. 

याचबरोबर मार्च २०१७मध्ये भारतीय क्रिकेट बोर्डाने भारतीय संघाच्या जर्सी स्पाॅन्सर्स म्हणून ओप्पोची निवड केली. त्यांनी लिलावात तब्बल १०७९ कोटी रुपये मोजत ही बोली जिंकली होती. 

जुन २०१७मध्ये आयपीएल टायटल स्पाॅन्सर्सची बोली वीवो कंपनीने २१९९ कोटी रुपयांना विकत घेतली. हा करार २०१८ ते २०२३ या काळासाठी झाला आहे. 

या मार्गातून मिळणार बीसीसीआयला महसूल- 

१६३४७.५ कोटी- आयपीएलचे सामने- २०१८ ते २०२३- स्टार इंडिया
६१३८ कोटी- भारतात होणारे सामने- २०१८ ते २०२३- स्टार इंडिया
१०७९ कोटी- जर्सी स्पाॅन्सर्स- २०१७-२०२२- ओप्पो
२१९९ कोटी- आयपीएल टायटल स्पाॅन्सर्स- २०१८ ते २०२३- वीवो