बीसीसीआयला हवाय नवीन व्यवस्थापक

बीसीसीआय सध्या नवीन व्यवस्थापकाच्या शोधात आहे. बीसीसीआयला क्रिकेट तज्ञ् किंवा मोठ्या स्थरावर खेळलेला खेळाडू नवीन व्यवस्थापक म्हणून हवा आहे.

बीसीसीआयचे आधीचे व्यवस्थापक एम. व्ही. श्रीधर हे मागच्या महिन्यात झालेल्या त्यांच्या हैदराबादमधील घर संघटनेच्या आर्थिक घोटाळ्याच्या आरोपामुळे पदावरून पायउतार झाले आहेत. त्यामुळे बीसीसीआयला आता नवीन व्यवस्थापकाची गरज आहे.

बीसीसीआयने व्यवस्थापक पदाकरिता अर्ज मागवले आहेत. हे अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २३ ऑक्टोबर आहे. या पदाकरिता क्रिकेट तज्ञ् किंवा मोठ्या स्थरावर खेळलेला खेळाडू हवा अशी अट आहे.

बीसीसीआय तर्फे सचिव अमिताभ चौधरी आणि सीईओ राहुल जोहरी यांनी एम. व्ही. श्रीधर यांचे आभार मानले आणि त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.