भारतीय क्रिकेट संघासाठी विमान विकत घ्यावे !

0 45

भारतीय क्रिकेट संघाच्या व्यस्त कार्यक्रमामुळे भारतीय क्रिकेट बोर्डाने संघासाठी एक खास विमान विकत घ्यावे अशी मागणी केली आहे १९८३च्या विश्वविजेत्या संघाचा कर्णधार असणाऱ्या कपिल देव यांनी.

कपिल देव म्हणतात, ” सध्या बीसीसीआयकडे चांगला पैसे आहे. त्यामुळे बोर्डाने एक विमान विकत घ्यावे. त्यामुळे संघाचा वेळ वाचले आणि खेळाडूंना विश्रांतीही मिळेल. बीसीसीआयला हे शक्य आहे. त्यांनी हे पाच वर्षांपूर्वीच करायला हवे होते. ”

टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना कपिल देव पुढे म्हणाले, ” काही दिवसांनी क्रिकेटर्स स्वतःचे विमान विकत घेताना दिसतील. अमेरिकेत काही गोल्फरकडे त्यांचे विमान आहे. मला भारतीय बोर्डाने अशे विमान खरेदी करू नये यासाठी काही कारण दिसत नाही. दोन सामन्यांदरम्यान भारतीय संघाला विमान घेतल्यामुळे चांगली विश्रांती मिळेल. बीसीसीआय पार्किंगचे पैसेही आरामात देऊ शकते.”

एका एअरबस विमानाची किंमत अंदाजे ५०० कोटी असून त्यात १०० प्रवासी बसू शकतात. कपिल देव यांनी यापूर्वीच बीसीसीआयला सर्व मोठ्या शहरात गेस्ट हाऊस सुरु करण्याची विनंती केली होती. जेणेकरून खेळाडू त्या शहरात एखादा सामना खेळायला गेल्यावर तिथे राहू शकतात आणि त्यामुळे हॉटेलसाठी लागणाऱ्या पैशाची बचत होऊ शकते.

 

Comments
Loading...
%d bloggers like this: