डोप टेस्टमध्ये दोषी आढळलेला युसूफ पठाण पुन्हा क्रिकेट खेळू शकतो का?

0 100

बडोदा । बंदी घातलेल्या औषधाचे सेवन केल्यामुळे अडचणीत आलेला भारताचा अष्टपैलू खेळाडू युसूफ पठाणावरील बंदी १४ जानेवारी २०१८च्या रात्री उठवण्यात येणार आहे. त्यामुळे या खेळाडूचा देशांतर्गत क्रिकेट खेळण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचे बोलले जात आहे.

बीसीसीआयने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की जे बंदी घातलेले औषध युसूफच्या डोप टेस्टमध्ये सापडले ते कप सिरपमध्ये साधारणपणे दिसते. ” युसूफ पठाणने बीसीसीआयच्या anti-doping testing program प्रमाणे त्याच्या लघवीचे नमुने १६ मार्च रोजी दिले होते. हे नमुने जेव्हा तपासले गेले तेव्हा त्यात टरबुटलेचे काही नमुने आढळले. हे औषध वाडाने बंदी घातलेले आहे. ” असे पत्रकात म्हटले आहे.

मात्र युसूफने बीसीसीआयला दिलेल्या स्पष्टीकरणात आपण हे औषध चुकून घेतल्याचे सांगितले. त्याला हे औषध देताना जे नियमात दिले आहे ते न घेतल्याचेही त्याने कबूल केले.

बीसीसीआयचे युसूफच्या उत्तरामुळे समाधान झाले. शिवाय त्याने हे औषध त्याची कामगिरी सुधारण्यासाठी घेतले नसल्याचे सिद्ध झाले असल्याचे बीसीसीआयने म्हटले आहे. त्याचमुळे १४ जानेवारी रोजी युसूफवरील ५ महिन्यांची बंदी उठवण्यात येणार आहे.

पठाण भारताकडून ५७ वनडे, २२ टी२० २००८ ते २०१२ या काळात खेळला आहे. तो २००७च्या विश्वविजेत्या टी२० संघाचा तसेच २०११च्या ५० षटकांच्या विश्वविजेत्या भारतीय संघाचा भाग होता.

Comments
Loading...
%d bloggers like this: