पृथ्वी शॉची टीम इंडिया होणार मालामाल, मिळणार मोठे बक्षीस

मुंबई । भारतीय संघाने आज पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर विजय मिळवत १९ वर्षाखालील विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली. यामुळे भारतीय क्रिकेट बोर्डाने या १९ वर्षाखालील भारतीय वीरांचा रोख रक्कम देऊन सत्कार करण्याचे ठरवले आहे.

भारतीय संघ २०१८च्या १९ वर्षाखालील क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम फेरीत गेल्यामुळे बीसीसीआय या खेळाडूंचा सत्कार करेल असे प्रभारी अध्यक्ष सीके खन्ना यांनी सांगितले. शिवाय या खेळाडूंचा सत्कारही केला जाणार असून याची लवकरच घोषणा होईल.

” मी भारतीय संघातील प्रत्येक खेळाडूचे अभिनंदन करतो तसेच प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविडच्या कामगिरीचेही कौतुक करतो. द्रविडच्या मार्गदर्शनामुळे पुढच्या पिढीचे चांगले खेळाडू घडत आहे. त्याच्यामुळे आपल्याला १९ वर्षाखालील चांगले क्रिकेटपटू सध्या भारतात पाहता येतात. ” असेही खन्ना द्रविड आणि भारतीय संघाचं कौतुक करताना म्हणाले.

” भारतीय क्रिकेट बोर्ड खेळाडूंना रोख रक्कम बक्षीस म्हणून देईल तसेच त्यांचा गौरवही करेल. ” असे खन्ना पुढे म्हणाले.

भारताने आज झालेल्या उपांत्यफेरीच्या सामन्यात पाकिस्तानला २०३ धावांनी पराभूत केले. हा पाकिस्तानचा विश्वचषकातील सर्वात मोठा पराभव होता.