विंडीज दौऱ्यासाठी या दिवशी होणार टीम इंडियाची निवड; धोनीच्या भविष्याबाबत सस्पेन्स कायम

भारतीय संघ पुढील महिन्यात विंडीज दौऱ्यावर जाणार आहे. 3 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या या विंडीज दौऱ्यात तीन वनडे, तीन टी20 आणि दोन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. कसोटी मालिका ही आयसीसी टेस्ट चॅम्पियशिपचा भाग असेल.

या दौऱ्यासाठी बीसीसीआय निवड समीती 19 जूलैलै संघाची निवड करणार आहे. असे असले तरी अजून भारताचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीच्या भविष्याबाबद मात्र प्रश्नचिन्ह कायम आहे. मागील काही दिवसांपासून त्याच्या निवृत्तीबद्दलच्या चर्चा सुरु आहेत. त्यामुळे आता या विंडीज दौऱ्याआधी धोनीबद्दल निर्णय होणार हे पहावे लागेल.

याबद्दल दिल्लीमध्ये पार पडलेल्या सीओएच्या बैठकीनंतर बीसीसीआयच्या एका अधिकारीने पीटीआयला सांगितले की ‘निवडसमीतीची 19 जूलैला मुंबईमध्ये बैठक होईल. आम्हाला अजून धोनीकडून काहीही समजलेले नाही. पण खेळाडू आणि निवडकर्ते यांच्यात संवाद होणे महत्त्वाचे आहे.’

‘जर तूम्ही मला विचारले तर धोनी 2019 विश्वचषकात चांगला खेळला. पण त्याचे निर्णय तोच घेईल, त्याला पुढे खेळायचे आहे की नाही हे तोच ठरवेल.’

त्याचबरोबर विंडीज दौऱ्यातील मर्यादित षटकांच्या मालिकांसाठी भारताचा कर्णधार विराट कोहली आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांना विश्रांती देण्यात येण्याची शक्यता आहे. पण ते मर्यादीत षटकांच्या मालिकांनंतर होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी उपलब्ध असतील.

तसेच 2019 विश्वचषकादरम्यान दुखापतग्रस्त झालेल्या शिखर धवनबद्दल कोणतेही अपडेट्स देण्यात आलेले नाही. त्याच्या हाताच्या अंगठ्याला विश्वचषकात ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळताना फ्रॅक्चर झाले होते. त्यामुळे त्याचीही या विंडीज दौऱ्यासाठी निवड करणार का हे देखील पहावे लागेल.

वरिष्ठ भारतीय संघाच्या आधी सध्या भारत अ संघाचा विंडीजचा दौरा सुरु आहे. त्यामुळे जर वरिष्ठ संघातील काही खेळाडूंना विंडीज दौऱ्यासाठी विश्रांती देण्यात आली तर भारत अ संघाकडून खेळणाऱ्या पृथ्वी शॉ, मयंक अगरवाल, श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकुर, नवदीप सैनी अशा काही खेळाडूंना वरिष्ठ संघात खेळण्यासाठी संधी दिली जाऊ शकते.

असा असेल भारताचा विंडीज दौरा 2019 – 

टी20 मालिका –

3 ऑगस्ट – पहिला टी20 सामना – फ्लोरीडा

4 ऑगस्ट – दुसरा टी20 सामना – फ्लोरीडा

6 ऑगस्ट – तिसरा टी20 सामना – गयाना

वनडे मालिका –

8 ऑगस्ट – पहिला वनडे – गयाना

11 ऑगस्ट – दुसरा वनडे – त्रिनिदाद

14 ऑगस्ट – तिसरा वनडे – त्रिनिदाद

कसोटी मालिका –

22 ते 26 ऑगस्ट – पहिली कसोटी – अँटीग्वा

30 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर – दुसरा कसोटी – जमैका

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

विश्वचषकानंतर आयसीसीने जाहीर केलेल्या वनडे क्रमवारीत या भारतीय खेळाडूंचा बोलबाला कायम

सुपर ओव्हरदरम्यान बेन स्टोक्सने जोफ्रा आर्चरला दिला होता हा खास संदेश

विश्वचषक२०१९ च्या सर्वोत्तम ११ जणांच्या संघात आयसीसीने केली या दोन भारतीय खेळाडूंची निवड