बीच कबड्डी कबड्डी स्पर्धेत अमर संदेश, विकास, साईराज, साईनाथ ट्रस्टची विजयी सलामी

जुनी प्रभादेवी येथील ओम ज्ञानदीप मंडळ यांच्या विध्यमाने आणि मुंबई शहर कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने संपूर्ण मुंबई मध्ये प्रथमच एका मंडळाने “बीच कबड्डी (ज्युनिअर मुले) कबड्डी स्पर्धेला आजपासून सुरुवात झाली, स्पर्धेचे उद्घाटन नगरसेवक श्री. समाधान सरवनकर यांच्या शुभहस्ते झाले यावेळी मुंबई शहर कबड्डी असो. चे कार्याध्यक्ष श्री. मनोहर इंदुलकर, तसेच प्रमुख कार्यवाह श्री. विश्वास मोरे हे उपस्तीत होते.

उद्घाटणीय सामन्यात अमर संदेशने प्रभादेवीच्या जय दत्त क्रीडा मंडळाला ४७ – ३० अशा फरकाने पराभूत केले. अमर संदेशच्या विजयात अभिषेक पाल आणि दीप थर्वल यांचा सिंहाचा वाटा होता. जय दत्त चा सुरज चांदे बरा खेळला.

दुसऱ्या सामन्यात २०-२० अशी बरोबरी असणाऱ्या साईनाथ ट्रस्ट ने सिद्धेश राउतच्या चौफेर चढाया आणि सुरज आगटे, मयूर घंटेला यांची पकडीची मिळालेली साथ यांच्या जोरावर यंग प्रभादेवीचा शेवटी ४०-३५ असा ५ गुणांनी पराभव करून विजयी आगेकूच केली. यंग प्रभादेवीचा सौरभ पेटकर सचिन यादव चमकले.

तिसऱ्या सामन्यात बलाढ्य विकासाने करिरोडच्या अशोक मंडळाला ४८-३२ या फरकाने नमविले अवधूत शिंदे याचा अष्टपैलू खेळ आणि विराज सिंग आणि अजित पाटील यांची मिळालेली सुरेख साथ यांच्या बळावर विकासने विजय संपादन केला. पराभूत संघाचा रोशन वोगणे, निखिल पवार बरे खेळले.

शेवटच्या सामना अत्यंत चुरशीचा झाला काळाचौकीच्या साइराजने प्रभादेवी स्पोर्ट्स क्लब ला ४०-३९ असा नाममात्र १ गुणाने निसटता पराभव केला.मध्यांताराला सामना १९-१९ असा बरोबरीत होता. साईराज च्या तेजस चाळके आणि अनिकेत रामाने विजयाचे शिल्पकार ठरले. प्रभादेवी स्पोर्ट्स क्लब चा हर्षल तेरवनकर आणि दर्शन पांचाळ चे प्रयत्न निष्फळ ठरले.