बीच कबड्डी स्पर्धेत सिध्दीप्रभा – विजय क्लब यांच्यात अंतिम लढत

जुनी प्रभादेवी येथील ओम ज्ञानदीप मंडळ यांच्या विध्यमाने आणि मुंबई शहर कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने संपूर्ण मुंबई मध्ये प्रथमच
एका मंडळाने आयोजित केलेल्या “बीच कबड्डी (ज्युनिअर मुले) कबड्डी स्पर्धेत रविवारी सकाळच्या सत्रात उपांत्य फेरीचे सामने कळविण्यात आले उपांत्य फेरीच्या सामन्यात सिद्धीप्रभाने साईराज ला ४५-३६ असे पराभूत करून दिमाखात स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.

ओमकार ढवळे, अनिकेत भेलसेकर यांच्या चतुरस्त्र खेळाला या विजयाचे श्रेय जाते. साईराजचा सुशांत रामाणे एकाकी लढला.

दुसऱ्या उपांत्य फेरीच्या चुरशीच्या सामन्यात विजय क्लबने गुड मॉर्निंगला ३९-३७ असे २ गुणाने नमवित अंतिम फेरी गाठली. या विजयात अभिषेक रुपनर, रोशन थापा यांनी झंजावाती खेळ केला.

गुड मॉर्निंगच्या प्रणव भादवणकरने संघाला विजयी करण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत निकराची लढत दिली.पण अन्य कोणाची त्याला साथ न लाभल्याने तो संघाचा पराभव टाळण्यात असमर्थ ठरला.

अंतिम सामन्यासाठी सिद्धीप्रभा आणि विजय क्लब यांच्यात चुरस पाहायला मिळेल

चौथ्या दिवसाच्या पहिल्या सामन्यात विजय क्लब ने अमर संदेश ला ५१-२८ असा पराभव करून स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. विजयी संघाकडून अभिषेक रुपनर याने चढाया तर त्यांना पकडीमध्ये मिळालेली रोशन थापा यांची साथ याच्या बळावर विजय संपादन केला.

मध्यांताराला २७-११अशी आघाडी विजय क्लब कडे होती, पराभूत संघाचा रोहन उपाध्याय चमकला.

दुसऱ्या सामन्यात मध्यांताराला १७-१७ अशी बरोबरी असणाऱ्या साइराजने दुर्गामाता चे आव्हान ४०-२९ असे संपुष्टात आणले.साईराज कडून सुशांत रामाणे यांनी चढाया तर राज सकपाळ आणि तेजस चाळके ने सुंदर पकडी केल्या. दुर्गामाता कडून प्रथमेश पालांडे बरा खेळला.

तिसऱ्या सामन्यात चुरस पाहायला मिळाली सिद्धीप्रभा आणि विकास दोन्ही संघ विजयासाठी चिकाटीने प्रयत्न करीत होते मध्यांताराला १७-१५ अशी २गुणांची नाममात्र आघाडी असताना विकासने आपलं खेल उंचावला त्यांच्या अवधूत शिंदे आणि विराज सिंग याचे प्रयत्न वाया गेले शेवटी सिद्धीप्रभाने त्यांना ३६-३१ असे ५ गुणांनी पराभूत केले व स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली सिद्धीप्रभाकडून ओमकार ढवळे आणि अनिकेत भेलासकर ने अष्टपैलू खेळ केला.

आणखी एका सामन्यात गुड मॉर्निंगने जागृतीचा चुरशीच्या सामन्यात ३३-३२ अशा नाममात्र १गुणाने पराभव केला. गुड मॉर्निंग कडून वाजीद कनवथकर आणी प्रणय भादवनकर यांनी सुरेख खेळाचे प्रदर्शन केले जागृतीच्या रुपेश कीर लॅटिकेश कांबळे यांचे प्रयत्न निष्फळ ठरले.