मुंबईमध्ये वाळूवरील कबड्डीचा थरार बुधवारपासून

मुंबई | जुनी प्रभादेवी येथील ओम ज्ञानदीप मंडळ यांच्या विध्यमाने आणि मुंबई शहर कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने संपूर्ण मुंबईमध्ये प्रथमच बीच कबड्डी (ज्युनिअर मुले) कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

बुधवार दि. २५ एप्रिल २०१८ ते सोमवार दि. ३० एप्रिल २०१८ या कालावधीत प्रभादेवी चौपाटी, वाडिया बंगला समुद्रकिनारी स्पर्धा होणार आहे. सदर स्पर्धा ही बीच कबड्डी नियमांच्या आधारे खेळविली जाणार आहे.

मुंबईतल्या २० संघांना या स्पर्धेत प्रवेश दिला जाणार आहे. त्यात अमरहिंद, गोल्फदेवी, जागृती, जय दत्त, चंद्रोदय, विजय क्लब, विकास, दुर्गामाता, सिद्धीप्रभा, अमरसंदेश, गुड मॉर्निंग, साईनाथ ट्रस्ट अशा नामवंत संघांनी प्रवेश नोंदविला आहे.

यंदा मंडळाचं हे सलग कबड्डी स्पर्धा आयोजन करण्याचे हे २३ वे वर्ष आहे. या २३ वर्षात मंडळाने ३ राज्यस्तरीय स्पर्धा त्यामध्ये १ व्यावसायिक, १ स्थानिक पुरुष, १ ज्युनिअर मुले अशा स्पर्धा घेतल्या होत्या. येत्या २ वर्षांनी मंडळ २५ वा रौप्य महोत्सवी क्रीडा महोत्सव साजरा करणार आहोत, यावर्षी आम्ही या बीच कबड्डी आयोजनात यशस्वी झालो तर पुढे २ वर्षांनी राज्यस्तरीय बीच कबड्डी स्पर्धेच्या आयोजनाचा मानस मंडळाने ठेवला आहे.

या बीच कबड्डी स्पर्धेच आयोजन करण्याचे उद्धिष्ट एकच आतापर्यंत अनेक स्पर्धा क्रीडांगणावर, मॅटवर झाल्या. बीच कबड्डी हा सुद्धा एक आंतराष्ट्रीय खेळ आहे आणि याची खेळाची पद्धत व नियम वेगळे आहेत हे आमच्या मंडळाला लोकांपर्यंत पोहचावे. यामूळे या सामन्यांचे आयोजन करण्याचे शिवधनुष्य उचलले आहे. असे मंडळाकडून सांगण्यात आले आहे.