आयपीएल २०१९ सुरू होण्याआधी या संघाने केली नवीन प्रशिक्षकाची नेमणुक

आयपीएल २०१९ला २३ मार्चपासून सुरूवात होणार आहे. यंदाचे हे १२वे हंगाम असून राजस्थान रॉयल्सने लीग सुरू होण्याआधीच संघाच्या नवीन प्रशिक्षकाची घोषणा केली आहे.

पॅटी अपटन यांची राजस्थानच्या मुख्य प्रशिक्षकपदी नेमणुक करण्यात आली आहे. त्यांनी २०१३-२०१५मध्ये या संघाचे प्रशिक्षकपद सांभाळले आहे. त्यांच्या प्रशिक्षणा दरम्यान राजस्थान २०१३च्या हंगामात उपांत्य फेरीत पोहचला होता. तर चॅम्पियन्स लीगमध्ये खेळताना अंतिम फेरीत पोहचला होता.

त्याचबरोबर राजस्थानने अपटन यांच्या प्रशिक्षणाखाली घरच्या मैदानावर सलग १३ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे.

अपटन यांनी आयपीएलमध्ये पुणे वॉरीयर्स (२०१२)  मुख्य प्रशिक्षक म्हणून आणि दिल्ली कॅपिटल्स (दिल्ली डेयरडेविल्सचे २०१६ आणि २०१७) या संघासोबतही काम केले आहे.

“एक प्रशिक्षक आणि ट्रेनर म्हणून अपटन यांनी चांगली भुमिका निभावली आहे. तसेच त्यांना या संघाचा अनुभवही आहे”, असे राजस्थान क्रिकेटचे मुख्य जबीन भरूचा म्हणाले आहेत.

आयपीएल बरोबरच अपटन यांनी बिग बॅश लीगमध्ये सिडनी थंडर्न संघाचे ४ वर्ष प्रशिक्षकपद भुषविताना संघाला २०१५च्या अंतिम फेरीत पोहचवले होते. पाकिस्तान सुपर लीगच्या संघासोबतही त्यांनी प्रशिक्षक म्हणून काम सांभाळले आहे.

अपटन यांनी क्रिकेट लीग बरोबरच २०११च्या विश्वचषकामध्ये भारतीय क्रिकेट संघाच्या गॅरी कर्स्टन हे मुख्य प्रशिक्षक असताना संघाच्या मेंटल कंडीशनिंग प्रशिक्षकाच्या रूपात काम बघितले आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

युवराज सिंगची ती भविष्यवाणी ठरली खरी…

भारतीय क्रिकेटच्या इतिहासात दुसऱ्यांदाच घडली अशी घटना

Video: जेव्हा यजुवेंद्र चहल घेतो रोहित शर्माची मुलाखत!