मी केलेल्या त्या कृत्यापेक्षा बेन स्टोक्सची कृती वाईट: डेविड वॉर्नर

ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज डेविड वॉर्नरच्या मते बेन स्टोक्सचा हाणामारीची घटना ही माझ्या आणि जो रूटच्या भांडणापेक्षाही खराब आहे.

पुढील महिन्यात होणाऱ्या ऍशेस मालिकेत इंग्लंडचा हा स्टार अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स सहभागी होणार नाही. कारण त्याच्यावर अजूनही ब्रिस्टलमधील हाणामारीच्या घडणेवरून चौकशी चालू आहे. केसचा निकाल लागल्याशिवाय त्याला इंग्लंडकडून खेळता येणार नाही. तसेच त्याला देशाबाहेर जाण्याचीही परवानगी नाही.

क्रिकेट जरी ‘जेंटल मॅन गमे’ म्हणून ओळखला जात असला तरी ही हाणामारीची पहिली घडणा नाही. ४ वर्ष आधी बर्मिंगहॅम येथील एका बारमध्ये ऑस्ट्रेलियाच्या डेविड वॉर्नरने इंग्लंडच्या जो रूटला मुक्का मारला होता. त्यासाठी वॉर्नरला ऑस्ट्रेलियन बोर्डाने २ सामन्यांची बंदी घातली होती.

आता ऍशेस मालिका तोंडावर आलेली असताना वॉर्नरने आणखीन एक विवादात्मक वक्तव्य केले आहे.

वॉर्नर म्हणतो

” मला आमच्या बोर्डाने २ सामन्यांची बंदी घातली होती जेव्हा माझ्याकडून असे घडले होते. बेन स्टोक्सने केलेले हे कृत्य माझ्यापेक्षा ही वाईट आहे. आता सर्व जगाचे लक्ष इंग्लंडच्या बोर्डाकडे आहे बघुयात ते काय करतात.”