त्या फलंदाजाची आयपीएलमधील एक धाव पडली ७ लाख रुपयांना

मुंबई | आयपीएलचे शेवटचे ९ सामने बाकी असुन २७ मे रोजी आयपीएलला नवा विजेता मिळणार आहे. ५१ सामन्यानंतर आयपीएलच्या प्ले आॅफमध्ये दोन संघांनी प्रवेश केला आहे.

या आयपीएलमध्ये एक धाव सर्वाधिक रुपयांना पडली ती राजस्थान राॅयल्सच्या बेन स्टोक्सची. १३ सामन्यात त्याने केवळ १६.३३ च्या सरासरीने १९६ धावा केल्या आहेत. त्यात त्याला साधे एकही अर्धशतक करता आले नाही.

तो २०१७ आयपीएलमधील सर्वात महागडा खेळाडू होता तर २०१८ आयपीएलमध्ये तो सर्वात महागडा परदेशी खेळाडू ठरला. त्याला लिलावात तब्बल १.९६ मिलियन डाॅलर किंमत देऊन राजस्थानने संघात घेतले. त्याची एक धाव जवळपास १०, ००० डाॅलरला पडली. याचाच अर्थ त्याची एक धाव ७ लाखांच्या आसपास गेली.

गोलंदाजीतही त्याने १३ सामन्यात ८ विकेट्स घेतल्या आहेत. तो या आठवड्यात भारतातुन पुन्हा मायदेशी कसोटी मालिका खेळण्यासाठी रवाना होत आहे. त्यामुळे तो या हंगामात पुढे सामने खेळताना दिसणार नाही.

विरोधाभास म्हणजे हैद्राबादच्या केन विलियमसनची एक धाव ही केवळ ७२५ डाॅलरला गेली आहे. त्याने ६२५ धावा केल्या असुन त्याला या स्पर्धेत अजूनही कमीतकमी ३ सामने खेळायला मिळणार आहेत. त्यामुळे या मोसमातील त्याच्या धावा या सर्वात स्वस्त ठरु शकतात.

महत्त्वाच्या बातम्या-

रोहित शर्माच्या मुंबईसाठी अशी आहेत प्ले आॅफची समीकरणे!

गोलंदाजांसाठी ही आयपीएल या कारणामुळे ठरतेय खराब

तर कोलकाता जाणार आयपीएलमधून बाहेर

ख्रिस गेलच्या मनात धडकी, एबी डिव्हिलियर्स मोडतोय हा विक्रम

प्रो कबड्डी- जाणून घेऊयात लिलवासंदर्भातील सर्व नियमावली

एबी डिव्हिलियर्सला कर्नाटक राज्याचं मुख्यमंत्री करा!

विराट म्हणतोय, स्पायडरमॅनने घेतलेला हा कॅच पाहिला का?