अखेर प्रकरण मिटले, बेन स्टोक्सची निर्दोष मुक्तता

मागील वर्षी सप्टेंबरमध्ये इंग्लंड आणि विंडिज यांच्यातील वनडे मालिके दरम्यान इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू बेन स्टोक्सने केलेल्या मारहाण प्रकरणात त्याची मंगळवारी ज्यूरींनी निर्दोष मुक्तता केली आहे.

स्टोक्सबरोबरच या प्रकरणातील आरोपी रायन अलीलाही निर्दोष घोषित करण्यात आले आहे.हे प्रकरण 25 सप्टेंबर 2017ला रात्री नाईटक्लबमध्ये घडले होते.

या प्रकरणाची मागील सहा दिवसापासून सुनावणी सुरु होती. या प्रकरणाबद्दल फिर्यादीने सांगितले की स्टोक्सला 25 सप्टेंबरला रात्री 2.00 वाजता नाईटक्लबमध्ये प्रवेश नाकारल्याने तो नशेत आणि रागात होता.

पण स्टोक्सने सांगितले की त्याला जरी सर्व आठवत नसले तरी त्यारात्री तो विल्यम ओ’कॉनोर आणि काई बॅरी या दोन तृतीयपंथी व्यक्तींना वाचवण्यासाठी आत गेला होता. पण त्याचवेळी त्याला रायन अली आणि रायन हेल यांच्यापासून स्वत:चा बचाव करावा लागला. या दोघांनी तिथे गोंधळ घातला होता.

या प्रकरणात रायन हेल हा सुद्धा आरोपी होता परंतू त्याची मागील आठवड्यात निर्दोष मुक्तता करण्यात आली होती.

याप्रकरणाच्या न्यायालयीन सुनावनीमुळे स्टोक्सला इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात सुरु असलेल्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या कसोटीला मुकावे लागले होते. तसेच त्याची तिसऱ्या कसोटीसाठीही इंग्लंड संघात निवड झालेली नाही.

परंतू तो या मारहाणीच्या प्रकरणातून निर्दोष सुटल्याने 30 आॅगस्टपासून सुरु होणाऱ्या चौथ्या सामन्यासाठी त्याचा विचार होऊ शकतो.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

सचिन तेंडूलकरला अर्जूनमुळे बीसीसीआयच्या कमिटीची द्यावा लागणार राजीनामा?

तिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये होणार हे दोन मोठे बदल

सलग दोन दिवस दोन सामने खेळल्याने तूम्ही मरणार नाही; आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने टीम इंडियाला सुनावले