अॅशेस मालिकेसाठी अटकेनंतरही बेन स्टोक्स उपकर्णधारपदी कायम

आज इंग्लंड क्रिकेट बोर्डाने अॅशेस मालिकेसाठी १६ जणांचा संघ जाहीर केला आहे. जो रूट कर्णधारपदी तर बेन स्टोक्स उपकर्णधारपदी कायम आहेत. यष्टीरक्षक बेन फोअक्सला आणि क्रेग ओव्हरटनला पहिल्यांदाच कसोटी संघात संधी देण्यात आली आहे.

सोमवारी बेन स्टोक्सला अटक करण्यात आली होती. नाईटक्लबमध्ये मारहाण केल्याचा आरोप त्याच्यावर होता. चौकशीनंतर त्याला सोडूनही देण्यात आले. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने त्याच्यावर कारवाई म्हणून विंडीज विरुद्धच्या ४ थ्या व ५ व्या वनडे सामन्यांसाठी त्याला वगळले.

यावर्षीची अॅशेस मालिका ऑस्ट्रेलियात होणार असून २३ नोव्हेंबर पासून या मालिकेला सुरुवात होईल. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघात होणारी ही मालिका मानाची मानली जाते.

असा आहे इंग्लंडचा संघ:
जो रूट(कर्णधार), मोईन अली, जेम्स अँडरसन, जॉनी बेरस्टोव(यष्टीरक्षक), जॅक बॉल, गॅरी बॅलन्स, स्टुअर्ट ब्रॉड, अॅलिस्टर कूक, मसोन क्रेन, बेन फोअक्स(यष्टीरक्षक), डेविड मालन, क्रेग ओव्हरटन, बेन स्टोक्स(उपकर्णधार), मार्क स्टोनमन, जेम्स विन्स, ख्रिस वोक्स.