इंग्लंडचा स्टार ऑलराउंडर बेन स्टोक्स झाला या फुटबॉल क्लबचा अधिकृत फॅन

इंग्लंडमध्ये सध्या इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 71 वी ऍशेस मालिका सुरु आहे. या मालिकेतील रोमहर्षक झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात रविवारी(25 ऑगस्ट) इंग्लंडने 1 विकेटने विजय मिळवला. इंग्लंडच्या या विजयाचा शिल्पकार अष्टपैलू क्रिकेटपटू बेन स्टोक्स ठरला.

त्याने दुसऱ्या डावात नाबाद 135 धावांची शतकी खेळी केली. तसेच शेवटच्या विकेटसाठी जॅक लीचबरोबर महत्त्वपूर्ण नाबाद 76 धावांची भागीदारीही रचली आणि इंग्लंडला विजय साकारुन दिला.

या सामन्यानंतर शुक्रवारी(30 ऑगस्ट) इंग्लिंश फुटबॉल क्लब टोटेनहॅम हॉट्सपर संघाकडून स्टोक्सला एक त्याचे नाव आणि जर्सी क्रमांक असलेली क्लबची जर्सी भेट मिळाली आहे. ही जर्सी मिळाल्यानंतर स्टोक्सने जर्सीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. तसेच म्हटले आहे की तो या फुटबॉल क्लबचा अधिकृत चाहता झाला आहे.

स्टोक्सने ट्विट केले आहे की ‘मी कोणत्याही क्लबला पाठिंबा दिला नाही. मी पाठिंबा देऊ इच्छित होतो पण मी कधी फुटबॉलवर एवढे प्रेम केले नाही. माझी पहिली फुटबॉल जर्सी ही टॉटेनहॅमची होती. ती निळी आणि पिवळी होती आणि त्यावर पुढे थॉमसन लिहिले होते. पण मला आत्ताची ही जर्सी मिळाल्यानंतर वाटते मी आता अधिकृतरित्या स्पर्स(टॉटेनहॅम)चा चाहता झालो आहे.’

स्टोक्सच्या ट्विटवर कमेंट करताना टोटेनहॅम हॉट्सपर क्लबने ट्विट केले आहे की ‘आम्हाला हे आवडले. तूझे स्पर्स कुटुंबात स्वागत आहे.’

तसेच टॉटेनहॅमचा स्ट्रायकर आणि इंग्लंड फुटबॉल संघाचा कर्णधार हॅरी केनने म्हटले आहे की ‘चांगली पसंत आहे. तूला उर्वरित ऍशेस मालिकेसाठी शुभेच्छा आणि ही मालिका संपल्यानंतर तूझे संघात स्वागत आहे.’

सध्या सुरु असलेल्या ऍशेस मालिकेतील चौथा कसोटी सामना मँचेस्टरमध्ये 4 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

१४० किलो वजनाच्या राहकिम कॉर्नवॉल पुजाराची विकेट घेतल्यानंतर म्हणाला…

कर्णधार कोहलीने शानदार अर्धशतक करत क्लाइव्ह लॉइड, ब्रायन लाराला टाकले मागे

विंडीज विरुद्ध कसोटीत संधी न मिळालेल्या शिखर धवनचा झाला या भारतीय संघात समावेश