स्टोक्ससाठी पहिल्या सामन्यातील सामनावीराला इंग्लंडकडून तिसऱ्या कसोटीत डच्चू

नाॅटिंगघम |  दुसऱ्या सामन्यात न खेळलेल्या बेन स्टोक्सला तिसऱ्या सामन्यात थेट ११ जणांच्या अंतिम संघात स्थान देण्यात आले आहे. १८ आॅगस्ट अर्थात उद्यापासून सुरु होणाऱ्या या सामन्यात २० वर्षीय सॅम करनला अंतिम संघातून वगळण्यात आले आहे.

या तरुण खेळाडून पहिल्या आणि दुसऱ्या कसोटीत चांगली कामगिरी केली होती. तसेच पहिल्या सामन्यात तो सामनावीर ठरला होता.

त्याची डावखुरी गोलंदाजी भारतीय फलंदाजांसाठी डोकेदुखी ठरली होती.

गेल्या आठवड्यात स्टोक्सची कोर्टात सुनावणी सुरु होती. त्याला आरोपातून निर्दोश मुक्त करण्यात आले. परंतु या कारणामुळे तो दुसऱ्या कसोटीत खेळू शकला नव्हता.

दुसऱ्या सामन्यात स्टोक्सच्या जागी ख्रीस वोक्सला संधी देण्यात आली होती. वोक्सनेही दुसऱ्या सामन्यात ४ विकेट्स तसेच नाबाद १३७ धावांची शतकी खेळी केली होती.

इंग्लंड संघाने पहिल्यांदा ट्रेंट ब्रीज कसोटीसाठी दुसऱ्या कसोटीतील संघात बदल केला नव्हता परंतु स्टोक्सच्या सहभागाबद्दल त्याची निर्दोष मुक्तता झाल्यावर निर्णय घेण्यात येणार होता.  मंगळवारी त्याला आरोपांतुन मुक्त केल्यामुळे त्याची पुन्हा अंतिम संघात वर्णी लागली.

भारत विरुद्ध इंग्लंड तिसरा कसोटी सामना १८ आॅगस्टपासून ट्रेंट ब्रीज येथे सुरु होत आहे. भारतीय संघाल पहिल्या कसोटी सामन्यात केवळ ३१ धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले तर दुसऱ्या कसोटीत संघाचा दारुण पराभव झाला.

सध्या संघ मालिकेत ०-२ असा पिछाडीवर आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

खेल भी जितिये, दिल भी जितिये- अटल बिहारी वाजपेयींनी दिला होता टीम इंडियाला खास संदेश

टीम इंडियाने वाहिली अजित वाडेकरांना श्रद्धांजली

नाहीतर सचिन कधीही सलामीवीर झाला नसता…