या खेळाडूला मिळणार विराट कोहलीपेक्षा आयपीएलमध्ये जास्त पैसे 

भारतीय संघांचा कर्णधार विराट कोहलीला आयपीएल २०१८ साठी तब्बल १७ कोटी रुपये मिळाले. त्यामुळे तो या मोसमातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. परंतु आयपीएलच्या पुढच्या आठवडयात होणाऱ्या लिलावात बेन स्टोक्स या खेळाडूला विराट कोहलीपेक्षा जास्त पैसे मिळू शकतात असे मत व्यक्त केले आहे भारताचा माजी कर्णधार वीरेंद्र सेहवागने. 

स्पोर्टसकिडाशी बोलताना सेहवाग म्हणाला, ” २-३ खेळाडू आहेत ज्यांना विराटपेक्षा जास्त किंमत मोजली जाऊ शकते. जेव्हा एखाद्या संघाला ठरवून एखादा खेळाडू घ्यायचा असतो आणि त्याचवेळी अन्य संघही त्या खेळाडूला संघात घेण्यासाठी बोली लावतात, त्यावेळी बोली मोठी जाते. त्यामुळे ज्या खेळाडूंची बेस प्राइज २ कोटी आहे त्यांना २० कोटी रुपये मिळू शकतात.”  

“मी गेल्यावेळी पाहिले आहे की मुंबई इंडियन्सला बेन स्टोक्सला संघात घ्यायचे होते परंतु त्यांच्याकडे तेवढी रक्कम नसल्यामुळे त्यांनी त्याला संघात घेतले नाही. यावेळी सगळ्या संघांकडे पैसे आहेत. त्यामुळे स्टोक्सला चांगली बोली लागू शकते. ” असेही सेहवाग पुढे म्हणाला.