मोठी बातमी: अखेर बेन स्टोक्स इंग्लंडच्या ऍशेस संघातून बाहेर !

इंग्लंड संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सला नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या ऍशेस मालिकेतून वगळण्यात आले आहे. त्याच्यावर रस्त्यावर झालेल्या मारहाण प्रकरणाबाबत अजूनही चौकशी चालू आहे. इंगलंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डने हा निर्णय घेतला आहे.

बेन स्टोक्सचे बोर्ड बरोबर असलेला मुख्य करार त्याने अबाधित ठेवला आहे पण त्याला ऍशेस मालिका खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाला जाता येणार नाही. बेन स्टोक्स हा इंग्लंडच्या संघाचा एक अविभाज्य घटक बनला आहे. त्याच्या गोलंदाजी आणि फलंदाजीमुळे इंग्लंड संघाला खूप सामने जिंकण्यास मदत झाली आहे.

मागील ऍशेस मालिकेतही बेनने चांगली कामगिरी केली होती. या अष्टपैलू खेळाडूने कसोटी क्रिकेटमध्ये ३५ च्या सरासरीने ३८०९ धावा केल्या आहेत तर ९५ विकेट्सही घेतल्या आहेत. या ऍशेस मालिकेत जर तो खेळला असता तर त्याला १०० विकेट्स पूर्ण करण्याची संधी होती.