धुत ट्रान्समिशन पुना क्लब करंडक पुरुष व महिला अखिल भारतीय मानांकन खुल्या टेनिस स्पर्धेत महाराष्ट्राच्या अन्वीत बेंद्रेचा जतीन दहियावर सनसनाटी विजय

पुणे। पुना क्लब यांच्या तर्फे आयोजित एआयटीए व एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या धुत ट्रान्समिशन पुना क्लब करंडक 3लाख रकमेच्या पुरुष व महिला अखिल भारतीय मानांकन खुल्या टेनिस स्पर्धेत उप-उपांत्यपूर्व फेरीत महाराष्ट्राच्या लकी लुझर ठरलेल्या अन्वीत बेंद्रे याने दिल्लीच्या चौथ्या मानांकित जतीन दहियाचा टायब्रेकमध्ये 6-4, 7-6(7) असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

पुना क्लब टेनिस कोर्ट येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत पुरुष गटात उप-उपांत्यपूर्व फेरीत महाराष्ट्राच्या कर्नाटकच्या अव्वल मानांकित सुरज प्रबोध याने आपली विजयी मालिका कायम ठेवत तेलंगणाच्या तरुण चिलकलापुडीचा 6-2, 6-3 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. काल मानांकित खेळाडूवर विजय मिळविणाऱ्या महाराष्ट्राच्या शाहबाज खान याने तेलंगणाच्या शशांक तीर्थ माचेरलाचा टायब्रेकमध्ये 6-2, 7-6(8) असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली.

तिसऱ्या मानांकित महाराष्ट्राच्या ध्रुव सुनिश याने आंध्रप्रदेशच्या निकित रेड्डीचे आव्हान 6-2, 7-6(2) असे मोडीत काढले. दिल्लीच्या दुसऱ्या मानांकित कुणाल आनंद याने तामिळनाडूच्या फहाद मोहम्मदला 6-2, 6-4 असे नमविले. दिल्लीच्या पाचव्या मानांकित अनुराग नेनवानी याने महाराष्ट्राच्या अथर्व शर्माचा टायब्रेकमध्ये 7-6(3), 7-6(9-7) असा संघर्षपूर्ण पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.

स्पर्धेचा सविस्तर निकाल:

उप-उपांत्यपूर्व फेरी: एकेरी: पुरुष गट:

सुरज प्रबोध(कर्नाटक)(1)वि.वि.तरुण चिलकलापुडी(तेलंगणा) 6-2, 6-3;
सुरेश दक्षिणेश्वर(तामिळनाडू)वि.वि.यश यादव(मध्यप्रदेश) 6-2, 6-3;
अन्वीत बेंद्रे(महाराष्ट्र)वि.वि.जतीन दहिया(दिल्ली)(4) 6-4, 7-6(7);
शाहबाज खान(महाराष्ट्र)वि.वि.शशांक तीर्थ माचेरला(तेलंगणा) 6-2, 7-6(8);
अनुराग नेनवानी(दिल्ली)(5)वि.वि.अथर्व शर्मा(महाराष्ट्र) 7-6(3), 7-6(9-7);
ध्रुव सुनिश(महाराष्ट्र)(3)वि.वि.निकित रेड्डी(आंध्रप्रदेश) 6-2, 7-6(2);
साहिल गवारे(महाराष्ट्र)वि.वि.अर्पित शर्मा(राजस्थान) 2-2,सामना सोडून दिला;
कुणाल आनंद(दिल्ली)(2)वि.वि.फहाद मोहम्मद(तामिळनाडू)6-2, 6-4;

दुहेरी:पुरुष गट: उपांत्यपूर्व फेरी:

शशांक तीर्थ माचेरला(तेलंगणा)/गुंजन जाधव(महाराष्ट्र)वि.वि. तरुण चिलकलापुडी(तेलंगणा)/फहाद मोहम्मद(तामिळनाडू) 6-2, 6-3;

अन्वीत बेंद्रे(महाराष्ट्र)/रोहन भाटिया वि.वि.कुणाल वझिरानी(महाराष्ट्र)/अनुराग नेनवानी(दिल्ली) 6-2, 6-1;

अरमान भाटिया(महाराष्ट्र)/ईशक इकबाल(पश्चिम बंगाल) वि.वि. ओमिंदर बैसोया/जगमित सिंग 6-4, 7-6(5);

परीक्षित सोमाणी/सुरेश दक्षिणेश्वर वि.वि.अथर्व शर्मा/वैदिक मनशॉ 6-2, 7-5;