पुण्यात होणाऱ्या आयपीएल सामन्यांमुळे अनेक फायदे

चेन्नई सुपर किंग्सचे घरच्या मैदानावर होणारे सामने कावेरी पाणी वादामुळे रद्द झाल्यामुळे पुढील सामने चेन्नई ऐवजी पुण्यामध्ये होणार आहेत.

पुण्यामध्ये होणाऱ्या सामन्यांविषयी बोलताना महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष अभय आपटे म्हणाले की, चेन्नई घरच्या मैदानावर खेळणार नाही ही दुर्देवाची बाब आहे; पण पुण्यात होणाऱ्या सामन्याचे अनेक फायदे आहेत.पुण्यातील सामन्यांमुळे चांगले उत्पन्न मिळू शकते आणि त्याच बरोबर चेन्नई सुपर किंग्सचे खेळाडू पुण्यामध्ये खेळले असल्यामुळे त्यांना त्याचा नक्कीच फायदा होईल.

पहिल्या सामन्यातील सुरक्षेविषयी बोलताना ते म्हणाले की, आम्ही उत्पन्न, परवानगी, पोलीस या सर्व गोष्टींची खबरदारी घेणार आहोत. हे आमच्या समोर निश्चितच एक मोठे आव्हान असणार आहे; पण आम्ही या आधी देखील आयपीयलच्या सामन्यांचे आयोजन केले आहे, त्यामुळे आम्हाला त्याचा अनुभव आहे. आम्ही सरकारची परवानगी मिळेपर्यंत वाट पाहू.

याआधीही पुण्यामध्ये आयपीयलचे अनेक सामने झाले आहेत व प्रेक्षकांकडूनही त्यास भरघोस प्रतिसाद मिळाला आहे.

चेन्नई सुपर किंग्सचा पुढील सामना पुण्यातील गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या स्टेडिअमवर 20 एप्रिलला आर अश्विन कर्णधार असलेल्या किंग्स इलेव्हन पंजाबशी होणार आहे.