भारतातील या स्टेडियमवर अफगाणिस्तान खेळणार इतिहासातील पहिला कसोटी सामना

गेल्यावर्षी कसोटी क्रिकेट खेळणारा देश अशी मान्यता मिळालेला अफगाणिस्तान देश आपला पहिला कसोटी सामना भारतात खेळणार आहे. हा सामना १४ जून ते १८ जून या काळात बेंगलोर येथील चिन्नास्वामी मैदानावर होणार आहे.

यावेळी भारतीय क्रिकेट बोर्डाकडून आणि अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाकडून संयुक्तपाने प्रसिद्धी पत्रक देण्यात आले आहे. मान्सूनच्या आगमनामुळे देशातील अन्य कोणत्याही मैदानावर हा सामना आयोजित करणे अवघड असल्यामुळे हा सामना बेंगलोर येथे घेण्यात येणार आहे.