जेव्हा विराट कोहली करतो महानगरपालिकेच्या बसने प्रवास…

आज बेंगलोर मेट्रोपॉलिटन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन अर्थात बीएमटीसीने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून विराट कोहली आणि एका बीएमटीसी बसचालकाचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमागील मुख्य कारण म्हणजे आज बेंगलोरचा संघ त्यांच्या होम ग्राउंड अर्थात एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळात असून गो ग्रीन हा संदेश चाहत्यांमध्ये जाण्यासाठी गेली ८ वर्षे बेंगलोरचा संघ एक उपक्रम राबवत आहे. त्यात निसर्ग वाचवा, जागतिक तापमान वाढ, सौर ऊर्जा, सार्वजनिक ट्रान्सपोर्ट या गोष्टीं बद्दल जनजागृती केली जाते.

यात चाहत्यांना स्टेडियमपर्यंत सार्वजनिक वाहतुकीचा वापर किंवा सायकलने प्रवास करण्याचं आवाहन करण्यात येते. त्याचाच एक भाग म्हणून बेंगलोरचा संपूर्ण संघ हॉटेल पासून मैदानापर्यंत बीएमटीसीच्या बसने आज आला. त्यात कर्णधार विराट कोहलीही मागे नव्हता.