भारत पेट्रोलियम संघाने पटाकवले शिनवेरी स्पर्धेचे विजेतेपद, महिला गटात शिवशक्ती संघाने मारली बाजी

दादर- शिवनेरी सेवा मंडळ, दादर मुंबई दरवर्षी नवरात्री मध्ये कबड्डी स्पर्धाच आयोजन करत असते. यंदा या स्पर्धेचे ५० वे वर्ष होते. या स्पर्धेत महाविद्यालय, स्थानिक आणि राज्यस्तरीय पातळीवरील खेळाडू खेळतात.

विशेष व्यवसायिक गटात अंतिम सामना भारत पेट्रोलियम विरुद्ध वेस्टर्न रेल्वे यांच्यात झाला. मध्यंतरा पर्यत भारत पेट्रोलियम संघाकडे १८-१३ अशी आघाडी होती. भारत पेट्रोलियम कडून चढाईत नितिन मदने, अजिंक्य कापरे तर पकडीमध्ये निलेश शिंदे यांनी चांगला खेळ केला.

दुसऱ्या हाफ मध्ये वेस्टर रेल्वे कडून चांगला खेळ बघायला मिळाला, पण त्याचा प्रयत्न कमी पडले. भारत पेट्रोलियम आपली आघाडी कायम ठेवत सामना ३१-२५ असा जिंकत अंतिम विजेतेपद पटाकवले.

महाविद्यालय विभागात झालेल्या इंदिरा गांधी विरुद्ध वंदे मातरम या अंतिम सामन्यात वंदे मातरम महाविद्यालयाने ३८-२८ अशी बाजी मारत अंतिमविजेतेपद पटाकवले. तर महिला विभागात शिवशक्ती महिला संघाने वीर जिजामाता संघाला ३७- १५ सहज नमवत अंतिमविजेतेपद पटाकवले.

आर. आर. एंटरप्राइजस विरुद्ध आर. बी. आय यांच्यात झालेल्या प्रथम क्षे. व्यवसायिक गटातील अंतिम सामना आर. आर. एंटरप्राइजस संघानं ६५-१७ च्या मोठ्या फरकाने जिंकला.

संक्षिप्त निकाल

महाविद्यालयीन गट
अंतिम विजयी- वंदे मातरम कॉलेज
उपविजयी- इंदिरा गांधी कॉलेज
उत्कृष्ट चढाईपटू- सुशांत साईल (इंदिरा गांधी कॉलेज)
उत्कृष्ट पकडपटू- संतोष वारकरी (इंदिरा गांधी कॉलेज)
मालिकवीर- अतुल देसले (वंदे मातरम)

प्रथम क्षे. व्यवसायिक गट
अंतिम विजयी- आर आर एंटरप्राइजस
उपविजयी- आर बी आय
उत्कृष्ट चढाईपटू- अनिकेत महाजन (आर बी आय)
उत्कृष्ट पकडपटू- ओमकार शिर्के (आर बी आय)
मालिकवीर- अरविंद देशमुख (आर आर एंटरप्राइजस)

महिला गट
अंतिम विजयी- शिवशक्ती महिला संघ
उपविजयी- वीर जिजामाता पोलीस संघ
उत्कृष्ट चढाईपटू- भक्ती इंदुलकर (वीर जिजामाता)
उत्कृष्ट पकडपटू- सिद्धी नाकवेकर (वीर जिजामाता)
मालिकवीर- प्रतीक्षा तांडेल (शिवशक्ती)

विशेष व्यवसायिक गट
अंतिम विजयी- भारत पेट्रोलियम
उपविजयी- वेस्टर्न रेल्वे
उत्कृष्ट चढाईपटू- सुनील जैपाल (वेस्टर्न रेल्वे)
उत्कृष्ट पकडपटू- रवींद्र (वेस्टर्न रेल्वे)
मालिकवीर- अजिंक्य कापरे (भारत पेट्रोलियम)

महत्त्वाच्या बातम्या:

टाॅप ३- आज प्रो कबड्डीत होणार हे तीन मोठे पराक्रम

टाॅप ३- प्रो कबड्डीच्या ६व्या हंगामात ५०पेक्षा जास्त गुण घेणारे ३ खेळाडू

मराठमोळ्या सिद्धार्थ देसाईने प्रो कबड्डीत मोडला अनुप व अजयचा विक्रम