रिशांक देवाडिगा, विशाल मानेचा खेळ पुन्हा पाहण्याची संधी, आंतर युनिट कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेस 20 फेब्रुवारीपासून प्रारंभ

पुणे | भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या तर्फे  23व्या पीएसपीबी आंतर युनिट कबड्डी अजिंक्यपद अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा पीवायसी हिंदू जिमखाना येथे दि.20 ते 24 फेब्रुवारी 2018 या कालावधीत रंगणार आहे.

पत्रकार परिषदेत अधिक माहिती देताना बीपीसीएलचे उपमहाव्यवस्थापक(डीजीएम) देवेंद्र जोशी यांनी सांगितले कि, स्पर्धेत ओएनजीसी, एमआरपीएल, सीपीसीएल व ईआयएल यांसारख्या नामांकित ऑईल कंपन्या सहभागी होत आहेत.

यामध्ये बीपीसीएलचे रिशांक देवाडिगा, निलेश शिंदे, विशाल माने, नितीन मदाने, काशिलिंग अडके, ओएनजीसीचे जसवीर सिंग, राजेश नरवाल, मनप्रीत सिंग, अमित राठी हे ऑईल क्षेत्रांतील  देशांतील अव्वल कबड्डीपटुंचा समावेश आहे.

स्पर्धेचे उदघाटन पीवायसी हिंदू जिमखाना कॉन्फरन्स हॉल येथे दि.20 फेब्रुवारी रोजी बीपीआरएलचे व्यवस्थापकीय संचालक अजय कुमार यांच्या हस्ते  होणार आहे. स्पर्धेस 21 फेब्रुवारीपासून प्रारंभ होणार असून सामने राउंड रॉबिन पद्धतीने  होणार आहे.

स्पर्धेचा अंतिम फेरीचा सामना 24 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4वाजता होणार असून त्यानंतर स्पर्धेचे पारितोषिक वितरण बीपीसीएलचे(मनुष्यबळ विभाग)कार्यकारी संचालक आर.आर. नायर यांच्या हस्ते होणार आहे.