आंतर महाविद्यालयीन बुद्धीबळ स्पर्धेत ‘भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ इंजिनिअरींग’ला विजेतेपद

पुणे। भारती विद्यापीठाच्या आयूर्वेद कॉलेजच्या वतीने आयोजित आंतर महाविद्यालयीन बुद्धीबळ स्पर्धेत भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ इंजिनिअरींग’ला विजेतेपद मिळाले. ‘न्यू लॉ कॉलेज’ उपविजेतेपदाचे मानकरी ठरले.

‘भारती विद्यापीठाच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरींग’ धनकवडी कॅम्पसमध्ये ही स्पर्धा झाली.

स्पर्धेतील विजेत्यांना आयुर्वेद कॉलेजचे उपप्राचार्य डॉ. विजय भालसिंग आणि कॉलेज ऑफ इंजिनिअरींग’चे प्राचार्य डॉ. आनंद भालेराव यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली.

या स्पर्धेत भारती विद्यापीठाची महाविद्यालये सहभागी झाली होती. यामध्ये ‘कॉलेज ऑफ इंजिनिअरींग’, ‘मेडिकल कॉलेज’, ‘आयुर्वेद कॉलेज’, ‘होमिओपॅथी कॉलेज’, ‘अ‍ॅम्पलिफाय कॉलेज’, ‘नर्सिंग कॉलेज’, ‘एन्व्हायर्नमेंट कॉलेज’, ‘यशवंतराव मोहिते कॉलेज’, ‘न्यू लॉ कॉलेज’, ‘कॉलेज ऑफ एम.एस.डब्ल्यू’, ‘बी पी एच कॉलेज’ (फिजिकल एज्युकेशन), ‘डेंटल कॉलेज’ (पुणे), ‘डेंटल कॉलेज’ (मुंबई), ‘इन्स्टिट्यूट ऑफ बायो टेक्नॉलॉजी’ या महाविद्यालयांचा समावेश होता.

स्पर्धेचा अंतिम सामना ‘कॉलेज ऑफ इंजिनिअरींग’आणि न्यू लॉ कॉलेज यांच्यात झाला. ‘कॉलेज ऑफ इंजिनिअरींग ने 30 पॉईट केले तर न्यू लॉ कॉलेज चे 25 पॉईंट झाले.

विजेत्या संघात ‘कॉलेज ऑफ इंजिनिअरींग’चे जय चौहान (इलेक्ट्रीकल विभाग), समर्थ जैन (सिव्हील), अमूल जयस्वाल (ईएनटीसी), विपूल मौर्य (मेकॅनिकल), अन्सूल गुप्ता (मेकॅनिकल), प्रखर जैन (मेकॅनिकल) यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते झाला.

स्पर्धेचे उद्घाटन शशीकांत कुतवळ (छत्रपती पूरस्कार विजेते) यांच्या हस्ते झाले. यावेळी अभिजीत पाटील (प्राचार्य, आयुर्वेद कॉलेज) डॉ. नेताजी जाधव (भारती विद्यापीठ) उपस्थित होते.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

-सर्व प्रश्नांचं उत्तर केवळ काळ देतो, रुट-कोहलीची ही आकडेवारी पाहुन कळेल नक्की कसे?

केवळ ६ धावा आणि क्रिकेट जगतातील सर्वात खास विक्रम कोहलीच्या नावे

लारा, ब्रॅडमन, पाॅटींग… सर्वांचे विक्रम किंग कोहलीने मोडले