16 वर्षाखालील अखिल भारतीय सुपर सिरीज् टेनिस स्पर्धेत अर्जुन गोहड, फैज नस्याम, आयुश भट, राधिका महाजन, हर्षिता बांगेरा यांचा उपांत्य फेरीत प्रवेश

पाचगणी । रवाईन हॉटेल यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए आणि एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसएलटीए योनेक्स सनराईज रवाईन हॉटेल 16 वर्षाखालील अखिल भारतीय सुपर सिरीज् टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या फैज नस्याम, अर्जुन गोहड, सर्वेश बिरमाने, कर्नाटकाच्या आयुश भट यांनी, तर मुलींच्या गटात तेलंगणाच्या आदिती आरे, महाराष्ट्राच्या राधिका महाजन, हर्षिता बांगेरा, सायना देशपांडे या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला.

पाचगणी येथील रवाईन हॉटेल येथील टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत 16वर्षाखालील मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या आठव्या मानांकित अर्जुन गोहडने चौथ्या मानांकित हरियाणाच्या आदित्य नांदलचा 4-6, 7-5, 6-3असा पराभव करून आगेकूच केली. कर्नाटकाच्या पाचव्या मानांकित आयुश भटने दुसऱ्या मानांकित चंदीगडच्या ऋषी जलोटाचा टायब्रेकमध्ये 6-4, 7-6(1)असा पराभव करून खळबळजनक निकाल नोंदविला. अव्वल मानांकित फैज नस्याम याने आपली विजयी मालिका कायम ठेवत काल मानांकित खेळाडूवर विजय मिळविणाऱ्या दक्ष अगरवालचा 6-0, 6-0असा एकतर्फी पराभव करून उपांत्य फेरी गाठली. तिसऱ्या मानांकित सर्वेश बिरमानेने करीम खानचा टायब्रेकमध्ये 6-4, 7-6(2)असा संघर्षपूर्ण पराभव केला.

मुलींच्या गटात महाराष्ट्राच्या तिसऱ्या मानांकित राधिका महाजनने रिया भोसलेचे आव्हान 6-2, 6-4असे संपुष्टात आणले. महाराष्ट्राच्या सायना देशपांडे हिने तेलंगणाच्या वैष्णवी वकीतीला 6-1, 6-1असे सहज पराभूत केले. अव्वल मानांकित तेलंगणाच्या आदिती आरेने गुजरातच्या सातव्या मानांकित बान्ही पांचाळचा 6-2, 6-1असा पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली. आठव्या मानांकित हर्षिता बांगेराने मधुरिमा सावंतवर 7-5, 6-3अशा फरकाने विजय मिळवला.

दुहेरीत उपांत्यपूर्व फेरीत मुलांच्या गटात अर्जुन गोहडने आयुश भटच्या साथीत दक्ष अगरवाल व प्रसाद इंगळे यांचा टायब्रेकमध्ये 6-3, 7-6(2)असा तर, साहेब सोधी व करीम खान यांनी अनर्घ गांगुली व वेदांत मेस्त्री या जोडीचा 6-1, 6-4असा पराभव केला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: उपांत्यपूर्व फेरी: 16वर्षाखालील मुले:
फैज नस्याम(महा)(1)वि.वि.दक्ष अगरवाल(महा)6-0, 6-0;
अर्जुन गोहड(महा)(8)वि.वि.आदित्य नांदल(हरियाणा)(4) 4-6, 7-5, 6-3;
सर्वेश बिरमाने(महा)(3)वि.वि.करीम खान(महा)6-4, 7-6(2);
आयुश भट(कर्नाटक)(5)वि.वि.ऋषी जलोटा(चंदीगड)(2)6-4, 7-6(1);

16वर्षाखालील मुली:
आदिती आरे(तेलंगणा)(1)वि.वि.बान्ही पांचाळ(गुजरात)(7) 6-2, 6-1;
हर्षिता बांगेरा(महा)(8)वि.वि.मधुरिमा सावंत(महा)7-5, 6-3;
राधिका महाजन(महा)(3)वि.वि.रिया भोसले(महा)6-2, 6-4;
सायना देशपांडे(महा)वि.वि.वैष्णवी वकीती(तेलंगणा) 6-1, 6-1;

दुहेरी गट: उपांत्यपूर्व फेरी: मुले:
फैज नस्याम/ऋषी जलोटा वि.वि.ईशान गोधभारले/क्रिस नासा6-1, 6-4;
अर्जुन गोहड/आयुश भट वि.वि.दक्ष अगरवाल/प्रसाद इंगळे 6-3, 7-6(2);
साहेब सोधी/करीम खान वि.वि.अनर्घ गांगुली/वेदांत मेस्त्री6-1, 6-4;
सर्वेश बिरमाने/यशराज दळवी वि.वि.रोहन कुमार/सिद्धार्थ जडली 6-4, 6-3;

मुली:
हर्षिता बांगेरा/राधिका महाजन वि.वि.रुमा गाईकवारी/ख़ुशी किंगर 6-2, 6-1;
रिया भोसले/स्नेहा रानडे वि.वि.श्रीनाथ मल्लेला/श्रीवल्ली मेदीशेट्टी 6-0, 4-6, 10-5;
वैष्णवी वकीती/आरणी येल्लू वि.वि.वेदा मधुसूदन/स्वरा काटकर 6-1, 6-4;
श्रावणी खवळे/परी चव्हाण वि.वि.मधुरिमा सावंत/आर्या पाटील 6-2, 3-6, 10-5.