दुसऱ्या श्री.शरदचंद्रजी पवार प्रौढ करंडक क्रिकेट स्पर्धेत भाऊसाहेब निंबाळकर इलेव्हन संघाचा अंतिम फेरीत प्रवेश

पुणे । साई9स्पोर्ट्स यांच्या तर्फे दुसऱ्या श्री.शरदचंद्रजी पवार प्रौढ करंडक क्रिकेट स्पर्धेत भाऊसाहेब निंबाळकर इलेव्हन संघाने राजू भालेकर इलेव्हन संघाचा 33 धावांनी पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.

नेहरू स्टेडीयम क्रिकेट मैदानावर झालेल्या सामन्यात आनंद दळवीच्या जलद 61 धावांच्या बळावर भाऊसाहेब निंबाळकर इलेव्हन संघाने राजू भालेकर इलेव्हन संघाचा 33 धावांनी पराभव करत अंतिम फेरी गाठली.

पहिल्यांदा खेळताना भाऊसाहेब निंबाळकर इलेव्हन संघाने 15 षटकात 4 बाद 125 धावा केल्या. यात आनंद दळवीने 45 चेंडूत 61 धावा करून संघाचा डाव भक्कम केला. रणजीत खिरीदने 20 व अनिरूध्द ओकने 16 धावा करून आनंदला सुरेख साथ दिली.

125 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना किरण आढाव , भुषण देशपांडे , अनिरूध्द ओक व विश्वास गवते यांच्या अचूक व आक्रमक गोलंदाजीपुढे राजू भालेकर इलेव्हन संघ 15 षटकात 8 बाद 92 धावांत गारद झाला.

किरण आढावने 21 धावांत 3 गडी तर षण देशपांडे व अनिरूध्द ओक यांनी प्रत्येकी 2 गडी बाद करून संघाला विजय मिळवून दिला. 45 चेंडूत 61 धावा करणारा आनंद दळवी सामनावीर ठरला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल- साखळी फेरी

भाऊसाहेब निंबाळकर इलेव्हन- 15 षटकात 4 बाद 125 धावा(आनंद दळवी 61(45), रणजीत खिरीद 20(13), अनिरूध्द ओक 16(14), नितिन सामल 2-25, शाम ओक 1-21, मंदार दळवी 1-22) वि.वि राजू भालेकर इलेव्हन- 15 षटकात 8 बाद 92 धावा(देवेंद्र मेधी 28, श्रीकांत काटे 22, नितिन सामल 16, किरण आढाव 3-21, भुषण देशपांडे 2-14, अनिरूध्द ओक 2-7, विश्वास गवते 1-14) सामनावीर- आनंद दळवी

भाऊसाहेब निंबाळकर इलेव्हन संघाने 33 धावांनी सामना जिंकला.