Maharashtra Kesari: भूगावकरांनी काढली महाराष्ट्र केसरीची वैभवशाली मिरवणूक

मानाची चांदीची गदा आणि आणि स्फूर्तीज्योती सोबत पैलवानांचा सहभाग

पुणे : हर हर महादेव….छत्रपती शिवाजी महाराज की जय… बोल बजरंग बली की जय चा जयघोष…ढोल ताशांचा गजर…लेझीम, हलगी वादकांचा जोश…गावकर्यांच्या उत्साह अशा जल्लोषाच्या वातावरणात महाराष्ट्र केसरी मध्ये सहभागी पैलवानांची स्फूर्तीज्योत हातात घेऊन मिरवणूक काढण्यात आली. फुलांचा वर्षाव करुन गावकºयांनी पैलवानांचे स्वागत करीत त्यांना शुभेच्छा दिल्या. जिल्हा व शहर तालीम संघाचे कुस्तीपटू स्पर्धेत सहभागी झाले होते. महाराष्ट्र केसरीचा रुबाब आणि वैभव या मिरवणूकीतून कुस्तीप्रेमींना पहायला मिळाले. 

 

समस्त ग्रामस्थ भूगांव, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ, मुळशी तालुका कुस्तीगीर संघ व मल्लसम्राट प्रतिष्ठान यांच्या वतीने आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने ६१ वी वरिष्ठ गट राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त भूगावामध्ये पैलवानांची मिरवणूक काढण्यात आली. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद मान्यतेने होणारी ही स्पर्धा भूगाव येथील कुस्तीमहर्षी मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीत सुरू आहे. 

 

यावेळी स्पर्धा संयोजन समितीचे शांताराम इंगवले, मुळशी तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष शिवाजी तांगडे, संदीप भोंडवे, स्वस्तिक चोंधे, अनिल पवार, संग्राम मोहोळ, आंतरराष्ट्रीय पंच दिनेश गुंड, राहुल शेडगे, संदीप इंगवले, अनिल पवार, संदीप तांगडे, कालिदास शेडगे तसेच रमेश सणस, मनोहर सणस, समीर साळुंके, कुमार शेडगे, अमोल भिलारे, बाजीराव खाणेकर, रामभाऊ चोंधे, नितीन तांगडे, संदीप चोंधे, बाळू सणस, योगेश भिलारे, जितेंद्र इंगवले, विशाल सुर्वे यांसह भूगाव ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.